छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘माझी तुझी रेशीमगाठ’. या मालिकेतील यश-नेहाच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. तर परीच्या क्यूटनेसची प्रेक्षकांना भूरळ पडली. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. आता ही मालिका लवकरच परतणार असल्याचे बोललं जात आहे. नुकतंच अभिनेता श्रेयस तळपदेने त्याचे संकेत दिले आहेत.

श्रेयस तळपदे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो आणि माझी तुझी रेशीमगाठ मालिकेचे दिग्दर्शक अजय मयेकर एकत्र दिसत आहे. “वो घड़ी जिसका आप सभी को इंतजार था …. आमची ही रेशीमगाठ कधीही तूटायची नाही!” असे कॅप्शन श्रेयसने या व्हिडीओला दिले आहे.
आणखी वाचा : “प्रथमेश लघाटेने प्रपोज केल्यानंतर होकार देण्यासाठी तीन दिवस का घेतले?” मुग्धा म्हणाली, “कारण मला…”

tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
A groom breaks down in tears as he watches his bride cry
नवरीला रडताना पाहून नवरदेवही रडला! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नशीबवान आहेस ताई तू…”
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
shukra guru make navpancham yog
नवपंचम राजयोग देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशींवर शुक्र-गुरूची होणार कृपा
Alia Bhatt Viral Video
तोंडाला मास्क, साधा लूक…; आलिशान गाडी सोडून आलिया भट्टचा रिक्षाने प्रवास; व्हिडीओ व्हायरल

“आम्हाला दोघांनाही मनापासून असं वाटतं होतं की आपण भेटावं. पण वेळ मिळत नव्हती. त्यामुळे शक्य होत नव्हतं. पण मनात दोघांच्या इतकं प्रेम होतं. माझी तुझी रेशीमगाठचे जितके चाहते आहेत, त्या सर्वांना आज हे पाहून प्रचंड आनंद होणार आहे. पण आज काहीही प्लॅन न करता दोघांचेही शूटींग एकाच ठिकाणी होते. आम्ही एकमेकांच्या समोरासमोर आलो, पाऊस पडत होता आणि त्या पावसात आमची रेशीमगाठ पुन्हा एकदा जोडून आली”, असे श्रेयस व्हिडीओच्या सुरुवातीला गमतीत म्हणतो.

त्यानंतर अजय मयेकर हे “सर मला जाऊ द्या, माझं शूटींग सुरु आहे”, असं सांगतात. त्यावर श्रेयस “जोपर्यंत तू ‘माझी तुझी रेशीमगाठ’चा दुसरा सीझन कधी येणार हे सांगत नाही तोपर्यंत मी तुला जाऊ देणार नाही”, असे त्यांना सांगतो. यावर अजय मयेकर यांनी “सर तुमच्या तारखा नाहीत, मॅडमच्या तारखा नाहीत”, असे म्हटले.

आणखी वाचा : “तुम्ही लग्नासाठी इस्लाम धर्म स्वीकारला का?” उर्मिला मातोंडकर म्हणाल्या “माझ्या नवऱ्याने…”

श्रेयसच्या या व्हिडीओवर प्रार्थना बेहेरेनेही कमेंट केली आहे. “श्रेयस तळपदे आणि अजय मयेकर सर तुम्हा दोघांसाठी माझ्या तारखा या फ्री आहेत”, असे म्हणते. तर या मालिकेत मीनाक्षी वहिनी हे पात्र साकारणारी अभिनेत्री स्वाती देवल “ही माझ्याही आहेत..मी ही free आहे….miss that days”, अशी कमेंट करते.

Story img Loader