अभिनेता आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा अभिनेता सोहम बांदेकर हा कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. सोहम हा स्टार प्रवाहवरील ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतून तो छोट्या पडद्यावर झळकला. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. ही मालिका अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. अनेकांनी ही मालिका पुन्हा सुरु करावी, अशी मागणी केली आहे. या मालिकेतील एका कलाकाराच्या पोस्टवर त्याने प्रतिक्रियेमुळे तो चर्चेत आला आहे.
‘नवे लक्ष्य’ ही मालिका ७ मार्च २०२१ रोजी सुरु झाली आहे. याची निर्मिती सोहम प्रॉडक्शन्सने केली होती. या मालिकेत महाराष्ट्र पोलिसांच्या कार्याचा वेध घेण्यात आला. महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी आपले प्राण पणाला लावून सेवा देणाऱ्या पोलिसांची शौर्यगाथा या मालिकेत पाहायला मिळाली. या मालिकेत सोहम बांदेकर, अभिजीत श्वेतचंद्र, उदय सबनीस, अमित डोलावत, शुभांगी सदावर्ते या कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडली होती.
आणखी वाचा : “आज शेवटचा भाग चित्रीत झाला अन्…” आदेश बांदेकरांच्या लेकाची ‘ती’ पोस्ट चर्चेत
काही महिन्यांपूर्वी या मालिकेचा शेवटचा भाग चित्रीत करण्यात आला. ही मालिका संपल्यानंतर अनेकजण या मालिकेची आठवण काढत आहेत. या मालिकेत डॅशिंग इन्स्पेक्टर विक्रांत गायकवाडने म्हणजेच अभिजीत श्वेतचंद्रने त्याच्या चाहत्यांसाठी Ask me anything या सेशनचे आयोजन केले होते. यावेळी अनेकांनी त्याला विविध प्रश्न विचारले आहेत. यामुळे तो चर्चेत आहे.
अभिजीत श्वेतचंद्रच्या एका चाहत्याने ‘नवे लक्ष्य’ या मालिकेबद्दल प्रश्न विचारला आहे. ‘सर मला नवे लक्ष्य २ मध्ये एखादे छोटे पात्र मिळेल का प्लीझ?’ असा प्रश्न एका चाहत्याने केला आहे. त्यावर अभिजीतने “नवे लक्ष्य पुन्हा सुरु झालं की नक्की”, असे उत्तर दिले आहे. त्याबरोबर त्याने सोहम बांदेकरलाही या पोस्टमध्ये टॅग केले आहे.
आणखी वाचा : ‘नवे लक्ष्य’ मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, आदेश बांदेकरांच्या लेकाने दिले संकेत
सोहमने अभिजीतच्या या पोस्टवर फारच हटके कमेंट केली आहे. “नवे लक्ष्य पुन्हा सुरु झाल्यावर आपण असू का हेच माहिती नाही… यांचं काय सांगू”, असे सोहमने म्हटले आहे. सोहमच्या या उत्तरानंतर अनेक चाहते चिंता व्यक्त करताना दिसत आहे. ‘नवे लक्ष्य २’ या मालिकेत वेगळे कलाकार असणार का अशी शक्यताही वर्तवली जात आहे. मात्र अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही.