‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या सोहम बांदेकरची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात त्याची छोटीशी भूमिका असली, तरी सोहमला त्याच्या सीनबद्दल चाहते प्रश्न विचारताना दिसत आहेत. अभिनयाबरोबर सोहम ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेच्या निर्मितीची धुरा सांभाळत आहे. काल, या मालिकेचा २०० वा भाग प्रसारित झाला. याच निमित्ताने सोहमने ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या टीमबरोबर सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी त्याने एका एण्टरटेन्मेंट मीडियाबरोबर बोलताना लोकांच्या मनात त्याच्याबद्दल असलेल्या प्रतिमेविषयी भाष्य केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘ठरलं तर मग’ मालिकेने २०० चा टप्पा पार केल्याच्या निमित्ताने सोहम ‘राजश्री मराठी’बरोबर संवाद साधत होता. त्यावेळेस त्याला विचारण्यात आलं की, “तुझे आगामी प्रोजेक्ट काय असणार आहेत?” यावर उत्तर देताना सोहम म्हणाला की, “मला या माध्यमातून एक सांगायला आवडले की, मी अजिबात माजुरडा नाहीये. लोकांना असं खूप वाटतं मी माजुरडा आहे, पण असं का वाटतं हे माहीत नाही. शिवाय याला कामाची काही गरज नाहीये, असंही लोकांना वाटतं. पण, तसं नाहीये.”

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने गायली अंगाई, पाहा व्हिडीओ

हेही वाचा – “आगाऊपणा बघा, तोंड उघडता येत नसले तरी…”; दीप अमावस्येबद्दल केतकी चितळेने केलेली पोस्ट चर्चेत

पुढे तो म्हणाला की, “मी सध्या निर्मितीच्या कामाबरोबरच इतर ठिकाणीही ऑडिशन देत आहे. माझ्यासाठी काहीही सोप्प नाहीये. लूक टेस्टसारख्या सगळ्या गोष्टी माझ्या हातात आहेत आणि तेच सध्या सुरू आहे.”

हेही वाचा – Video : “…अन् त्या एका मिनिटात मी १७ हजार वेळा मेले”, क्रांती रेडकरनं सांगितला अनुभव

दरम्यान, सोहम ‘नवे लक्ष्य’ या मालिकेपूर्वीही निर्मितीची जबाबदारी सांभाळायचा. त्याने ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘ललित २०५’ या मालिकेच्या निर्मितीची धुरा सांभाळली होती. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, संग्राम समेळ, अमृता पवार, अनिकेत केळकर, सागर तळशीकर महत्त्वाच्या भूमिकेत होते. या मालिकेनंतर सोहमने अभिनय क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor soham bandekar says people think i am a egoistic pps