मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून सुयश टिळकला ओळखले जाते. तो कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. सुयश टिळक आणि अभिनेत्री अक्षया देवधर हे दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. पण काळानंतर त्या दोघांचाही ब्रेकअप झाला. नुकतंच आता सुयश टिळकने अक्षयाबरोबरच्या ब्रेकअपबद्दल भाष्य केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नुकतंच सुयश टिळकने प्लॅनेट मराठीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत सुयश टिळकला त्याच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावेळी सुयश टिळकला अक्षया आणि त्याच्या साखरपुड्याबद्दल उडालेल्या अफवांबद्दल विचारण्यात आले. त्यावर त्याने स्पष्टीकरण दिले.
आणखी वाचा : राणादा आणि पाठकबाईंच्या साखरपुड्यावर एक्स बॉयफ्रेंडची पहिली प्रतिक्रिया, अक्षया देवधर म्हणाली…
“अक्षया आणि माझं नात मीडियाने खूप चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर मांडलं. माझा साखरपुडा झालाय, ही बातमी जेव्हा आम्हाला कळली. तेव्हा आम्हा दोघांनाही धक्का बसला होता. आपण साखरपुडा कधी केला, असा प्रश्न आम्हा दोघांनाही पडला होता.
त्यावेळी कोल्हापूरच्या एका ज्वेलर्सचे टायअप अक्षयाबरोबर झालं होतं. तेव्हा आम्ही दोघांनीही एक अंगठी घातली होती. तिने तो फोटो पोस्ट केला होता आणि त्यात ती अंगठी दिसत होती. त्या अंगठीमुळे लोकांना असं वाटलं की आमचा साखरपुडा झालाय”, असे स्पष्टीकरण सुयशने दिला.
आणखी वाचा : “आमचं लग्न…” प्रार्थना बेहेरेबरोबर अफेअरच्या चर्चांवर वैभव तत्त्ववादीचे वक्तव्य
“त्यानंतर खूप बातम्या यायला लागल्या. माझ्या घरचे खूप साधी माणसं आहेत. माझ्या कुटुंबातीलच सर्वच जण फार साधे आहेत. त्यांना या ग्लॅमरशी काहीही घेण-देण नाही. ते खूप साधं आयुष्य जगणारे आहेत. जेव्हा त्यांना हे सर्व समजलं तेव्हा आईने मला फोन केला. त्यावेळी आईला म्हटलं, अगं तुला नाही सांगणार का? तेव्हा काहीही घडत होतं. त्यानंतर मग ब्रेकअपच्याही बातम्या स्वत:हून अनेकांनी पसरवल्या.
काहीही लिहिलं जातं होतं, काहीही वाचायला मिळत होतं, त्यावेळी मी या सर्व प्रकरणावर काहीही बोलायचं नाही, असं ठरवलं होतं. कारण मला कोणचाही अनादर त्यावेळी करायचा नव्हता. मला तेव्हा अक्षयाचाही अनादर करायचा नव्हता. मी तेव्हा शांत राहिलो, त्याचे वेगळे अंदाज लावण्यात आले”, असेही सुयश टिळकने म्हटले.
आणखी वाचा : तब्बल २४ वर्षांनी ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाबद्दल काजोलचा खुलासा, म्हणाली “तर मी सलमानची…”
दरम्यान सुयश टिळक आणि अक्षया देवधरचं ब्रेकअप झाल्यानंतर इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले होते. सुयशने अक्षयासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्री आयुषी भावे हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. सध्या ते दोघेही सुखाचा संसार सुरु आहे. तर अक्षया देवधरने अभिनेता हार्दिक जोशीबरोबर विवाहबंधनात अडकली आहे.