काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांच्या मुलाने ठाण्यामध्ये स्वतःचं ‘महाराज’ हे नवीन रेस्टॉरंट सुरू केलं. अनेक वर्षं फूड ट्रकचा व्यवसाय उत्तमपणे चालवल्यानंतर आता त्याने स्वतःच हॉटेल सुरू केलं आहे. या हॉटेलचा उद्घाटनही दणक्यात करण्यात आलं. या वेळेचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत होते. तर नुकताच अभिनेता सुयश टिळक या रेस्टॉरंटमध्ये गेला होता आणि तेथील पदार्थांची चव कशी आहे हे त्याने सांगितलं.

सुप्रिया पाठारे त्यांच्या कामाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची माहिती सोशल मीडियावरून चाहत्यांची शेअर करत असतात. अभिनय क्षेत्रातील त्यांच्या कामाबरोबरच त्या लेकाच्या या हॉटेल व्यवसायामध्ये तितकाच सक्रिय सहभाग घेतात. या रेस्टॉरंटच्या उद्घाटनाला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. तर आता सुयश टिळक या रेस्टॉरंटमध्ये आल्याचं सुप्रिया पाठारे यांनी त्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये सांगितलं.

Uber driver offer different facilities
‘फ्लाइटपेक्षा उत्तम…’ कॅबमध्ये खाण्यापिण्याची सोय पाहून प्रवासी झाला खूश; PHOTO शेअर करीत म्हणाला…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Swanandi Tikekar new home
स्वानंदी टिकेकरने घेतलं नवीन घर! पतीसह फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी, दाखवली नव्या घराची झलक
santosh juvekar reveals his experience to working with vicky kaushal in chhaava
“माझी सुट्टी होती, विकीने अचानक सेटवर बोलावून घेतलं अन्…”, संतोष जुवेकरने सांगितला ‘छावा’च्या सेटवरचा अनुभव, म्हणाला…
These simple tips will help to make a delicious food
जेवण बनवताना खूप धावपळ होते? ‘या’ सोप्या टिप्स रूचकर जेवण बनवण्यासाठी करतील मदत
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”
Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”
soumendra jena success story
Success Story: १० बाय १० ची खोली ते दुबईतील आलिशान बंगला; १७ वर्षांच्या मेहनतीने बदलले नशीब

आणखी वाचा : ‘असं’ आहे सुप्रिया पाठारे यांच्या लेकाने ठाण्यात सुरू केलेलं नवीन हॉटेल, पाहा खास झलक

त्यांनी त्यांचा आणि सुयशचा त्या हॉटेलमध्ये शूट केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्या व्हिडिओमध्ये सुप्रिया पाठारे म्हणतात, “आज आपल्या महाराष्ट्र हॉटेलमध्ये सुयश टिळक आला आहे आणि त्याने त्याची आवडती हरियाली पावभाजी आणि सोया चाप खाल्ले आहेत. हे पदार्थ कसे वाटले हे आपण त्यालाच विचारूया.” त्यावर सुयश म्हणतो, “मला खूप आवडलं. मी याआधी आयुष्यात कधीच सोयाबीन असे या फॉरमॅटमध्ये खाल्लेले नाहीत. त्यामुळे मी खूप खुश आहे की मी पावभाजीबरोबर सोया चाप ट्राय केले. तुम्ही जर आयुष्यात कधीच सोयाबीन खाल्लेले नसतील किंवा तुम्हाला खाऊन बघायचे असतील तर नक्की ‘महाराज’मध्ये या. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल आणि तुम्हाला जर तुमचे नॉन व्हेजिटेरियन मित्र चिडवत असतील की, तुम्ही फक्त पनीर टिक्का खाणार प्रोटीनसाठी तुम्ही काय खाणार? तर तुम्ही हे सोया चाप खाऊन बघा तर तुम्ही आयुष्यात नॉनव्हेज कधीही मिस करणार नाही.”

हेही वाचा : “फूड सेंटर सुरू करायचं ठरवलं तेव्हा…”, लेकाच्या हॉटेलबद्दल सुप्रिया पाठारेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या, “पाव भाजीबरोबरच इथे…”

दरम्यान, त्यांचा हा व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांना खूप आवडला असून त्यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत. सुप्रिया यांचा मुलगा मिहिर पाठारे हा प्रोफशनने शेफ आहे, हे बऱ्याच जणांना माहित आहे. परदेशात लोकप्रिय असलेली फूट ट्रकची संकल्पना त्याने ठाण्यात सुरू केली. आता हे त्याचं नवीन हॉटेल ठाण्यातील खेवरा सर्कल, रामजी हॉटेलच्या समोर, पोखरण, रोड नं २ वर आहे.

Story img Loader