अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने २३ जुलै रोजी गायक आशिष कुलकर्णीशी साखरपुडा उरकला. सध्या तिच्या साखरपुड्याची आणि लग्नाची जोरदार चर्चा आहे. स्वानंदी ही ज्येष्ठ अभिनेते उदय टिकेकर आणि सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांची कन्या आहे. तिचं लग्न कधी होणार याबाबत तिचे वडील उदय टिकेकर यांनी माहिती दिली.

साखरपुडा झाला, लग्न कधी करणार? स्वानंदी टिकेकर म्हणाली, “आमच्या आयुष्यातील एका…”

saif ali khan bandra apartment inside details
५ बेडरूम, जिम, स्विमिंग पूल अन्…; सैफ अली खानवर हल्ला झाला ते घर आहे तरी कसं? ‘इतक्या’ कोटींना केलेलं खरेदी
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
Saif Ali Khan Attacked News
“मध्यरात्री २.३० वाजता…”, सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्यावर जवळच्या व्यक्तीचा खुलासा, सांगितला संपूर्ण घटनाक्रम
Premachi Goshta Fame Apurva Nemlekar dance on Rekha song in ankhon ki masti
Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Tula Shikvin Changalach Dhada Fame Hrishikesh Shelar
व्हिलन ‘दौलत’ ते आदर्श मुलगा ‘अधिपती’…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिका कशी मिळाली? हृषिकेश शेलार म्हणाला…

स्वानंदी व आशिषचा साखरपुडा झाल्यानंतर त्यांचं लग्न कधी होणार, याची चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे. स्वानंदीने अजुन त्याबाबत सांगितलेलं नाही, लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं ती म्हणाली होती. मात्र तिच्या वडिलांनी लग्न कधी व कुठे होणार याबाबत सांगितलं आहे. उदय टीकेकर म्हणाले, “स्वानंदी व आशिष यांचं लग्न डिसेंबरमध्ये होईल. त्यांचं लग्न पुण्यातच होईल. आम्हीही पुण्याचेच आहोत आणि आशिषचं कुटुंबही पुण्याचं आहे. मी कामानिमित्त मुंबईत असतो. लग्नाचं ठिकाण पुणे असेल पण लोकेशन खूप सुंदर असेल.”

“असे शब्द जे तू वडिलांना सांगू शकत नाही”, चाहत्याने रवींद्र महाजनींबद्दल विचारलेल्या प्रश्नावर गश्मीर म्हणाला, “मी माझ्या…”

मुलीच्या लग्नाबद्दल त्यांच्या भावना उदय टिकेकर यांनी सांगितल्या. “मुलगी लग्न करून जाईल त्यामुळे भावुक होणार नाही. कारण आम्ही तिघेही आतापर्यंत एकमेकांपासून कामानिमित्त दूर जायचो. मी भावुक होतोय कारण ती खूप चांगल्या लोकांमध्ये जाणार आहे. मुलगा खूप चांगला आहे. बाप्पाची कृपा आहे की तिला चांगलं कुटुंब आणि चांगला मुलगा मिळाला आहे, त्यांनाही चांगली मुलगी मिळाली आहे. या गोष्टीमुळे मी खूप भावुक होत आहे,” असं उदय टिकेकर म्हणाले.

स्वानंदी ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेसाठी विशेष ओळखली जाते. ‘अस्सं माहेर नको गं बाई’, “अगं अगं सुनबाई…” या मालिकेत स्वानंदीने मुख्य भूमिका केल्या होत्या. तर आशिष ‘इंडियन आयडॉल’मध्ये दिसला होता.

Story img Loader