Bigg Boss 18: लोकप्रिय टीव्ही रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १८’ उद्या रविवारी (६ ऑक्टोबर) रात्री ९ वाजतापासून सुरू होईल. सलमान खान होस्ट करत असलेल्या या शोचा ग्रँड प्रिमिअर रविवारी होणार आहे. या शोमध्ये कोणते स्पर्धक असतील, याबाबत प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे. अशातच कलर्सने शेअर केलेला नवीन प्रोमो पाहून चाहत्यांनी एका स्पर्धकाला ओळखलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिग बॉस १८ मधील (Vivian Dsena in Bigg Boss 18) एक स्पर्धक म्हणजे विवियन डिसेना होय. विवियन हा छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने २००८ मध्ये ‘कसम से’ या शोमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र, ‘प्यार की ये एक कहानी’ या शोमधील भूमिकेतून त्याला प्रसिद्धी मिळाली. त्याने ‘मधुबाला-एक इश्क एक जुनून’, ‘शक्ती – अस्तित्व का एहसास’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. विवियन त्याच्या व्यावसायिक जीवनात खूप यशस्वी झाला, मात्र वैयक्तिक आयुष्यात त्याला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला.

हेही वाचा – Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात पुन्हा एंट्री, पण ‘तो’ एक सदस्य गैरहजर; नेटकरी म्हणाले…

विवियनचा घटस्फोट अन् दुसरं लग्न

विवियनने २०१३ मध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री वाहबिज दोराबजीशी लग्न केलं होतं. सात वर्षांच्या संसारानंतर २०२१ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर विवियनने दुसरं लग्न केलं. घटस्फोटानंतर विवियनने इजिप्तची पत्रकार नूरन अलीशी लग्नगाठ बांधली. त्या दोघांना एक मुलगीही आहे. ‘उडारियां’ फेम अभिनेता आता बिग बॉसच्या घरात दिसणार आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18: सलमान खानचा शो केव्हा, कुठे पाहता येणार? जाणून घ्या प्रिमियरची तारीख अन् स्पर्धकांची नावं

विवियन डिसेनाने स्वीकारला इस्लाम धर्म

ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेल्या विवियनने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. २०१९ पासून आपण इस्लाम धर्माचे पालन करत असल्याचं विवियनने एका मुलाखतीत सांगितलं होतं. “माझ्या आयुष्यात फारसा बदल झालेला नाही. माझा जन्म ख्रिश्चन कुटुंबात झाला आणि आता मी इस्लामचे पालन करतो. २०१९ सालातील रमजान महिन्यापासून मी इस्लामचे पालन करण्यास सुरुवात केली. दिवसातून ५ वेळा प्रार्थना केल्याने मला खूप चांगलं वाटतं,” असं विवियन डिसेना एका मुलाखतीत म्हणाला होता.

Bigg Boss 18 House Tour: गुहेसारखं स्वयंपाकघर, तर किल्ल्यासारखी बेडरूम, पाहा बिग बॉसच्या घराची पहिली झलक

बिग बॉस १८ मधील संभाव्य सदस्य

विवियन डिसेना, निया शर्मा, आकृती नेगी, दिग्विजय राठी, हर्ष बेनीवाल, जशवंत बोपन्ना, समीरा रेड्डी, करण वीर मेहरा, चाहत पांडे, अविनाश मिश्रा, आणि शेहजादा धामी, गुणरत्न सदावर्ते, शिल्पा शिरोडकर हे बिग बॉस १८ चे संभाव्य स्पर्धक असतील, अशी चर्चा आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor vivian dsena in bigg boss 18 he divorced vahbbiz dorabjee converted in islam married to nouran aly hrc