‘झी मराठी’ वाहिनीवर जुन्या मालिका प्रेक्षकांच्या निरोप घेऊन नवे रिअ‍ॅलिटी शो आणि नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. ‘लोकमान्य’, ‘यशोदा – गोष्ट श्यामच्या आईची’, ‘लवंगी मिरची’, ‘दार उघड बये’ या मालिकांनंतर आता ‘३६ गुणी जोडी’ आणि ‘नवा गडी नवं राज्य’ या ऑफ एअर होणार आहेत. ‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका २३ डिसेंबरला प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंग पार पडले. यावेळी मालिकेतील सगळ्या कलाकारांनी शूटिंगच्या शेवटचा दिवस आनंदात साजरा केला. याचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.

अभिनेत्री श्रृती मराठे आणि अभिनेता गौरव घाटणेकर यांच्या ‘ब्लॅक कॉफी प्रोडक्शन’ची निर्मिती असलेली ‘नवा गडी नवं राज्य’ मालिका ८ ऑगस्ट २०२२ पासून सुरू झाली होती. अभिनेत्री पल्लवी पाटील, अनिता दाते-केळकर, कश्यप परुळेकर, वर्षा दांदळे अशी जबरदस्त कलाकार मंडळी असलेली या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं. रमाचा संसार सांभाळणारी आनंदी घराघरात पोहोचली. रमा-राघवच्या संसारात आलेला हा नवा गडी म्हणजेच आनंदीचं काही काळाने नवं राज्य पाहायला मिळालं. या मालिकेतील नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस पडले. त्यामुळे मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आणि अधिराज्य करू लागली.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
Marathi actress Mukta Barve special post after appearing in Indrayani serial
‘इंद्रायणी’ मालिकेत झळकल्यानंतर मुक्ता बर्वेची खास पोस्ट, म्हणाली, “कितीतरी दिवसांनी…”
bjp slogans batenge to katenge ek hai to safe hai in maharashtra assembly elections
अग्रलेख : घोषणांच्या म्हशी…
Lakhat Ek Aamcha Dada fame nitish Chavan wishing post for Mahesh Jadhav
Video: “काजू आकाराने छोटा असला तरी त्याचा भाव…”, ‘लाखात एक…’ फेम नितीश चव्हाणने महेश जाधवला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा
nitish kumar bows down to touch feet of pm modi
VIDEO: भरसभेत नितीश कुमार पाया पडायला गेले अन् नरेंद्र मोदींनी…; नेमकं काय घडलं?

पण मध्यंतरी मालिकेची मूळ वेळ बदलण्यात आली. तरीही मालिकेला प्रतिसाद चांगला मिळत होता. मात्र त्यानंतर मालिकेच्या वेळा सतत बदलण्यात आल्या. सध्या मालिका दुपारी २ वाजता प्रसारित होत आहे. पण आता ‘नवा गडी नवं राज्य’ शेवटच्या टप्प्यात आली आहे. २३ डिसेंबरला मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. १० डिसेंबरला मालिकेचं शेवटचं शूटिंग पार पडलं. तेव्हा सर्व कलाकारांनी केक कापून शेवटचा दिवस साजरा केला. यावेळी मालिकेचे निर्माते अभिनेत्री श्रृती मराठे व अभिनेता गौरव घाटणेकर उपस्थित होते. याचा व्हिडीओ ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी शेअर केला आहे.

हेही वाचा – “रणबीरला पहिल्यांदा भेटलो तेव्हा…” उपेंद्र लिमयेंनी सांगितला किस्सा; म्हणाले, “अहंकार…”

“‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेच्या समारोपचा केक आमच्या दोन बाळकलाकारांनी कापला..चिंगी आणि श्रीअंग… शेवट गोड सगळंच गोड..”, असं कॅप्शन लिहित वर्षा दांदळे यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओवर मालिकेच्या बऱ्याच प्रेक्षकांची नाराजी व्यक्त केली आहे. “या मालिकेच्या बाबतीत समारोप हा शब्द सुध्दा नको वाटतोय ऐकायला”, “मालिका बंद करायला नाही पाहिजे”, “हा शेवट पाहणं अवघड आहे”, “परत एकदा एकत्र भेटा प्लीज”, अशा प्रतिक्रिया मालिकेच्या प्रेक्षकांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.

हेही वाचा – Premachi Goshta: “असाच…” संगीत सोहळ्यातील राज हंचनाळेचा लूक पाहून खऱ्या बायकोची प्रतिक्रिया, सल्ला देत म्हणाली, “१० वेळा…”

दरम्यान, ‘३६ गुणी जोडी’ आणि ‘नवा गडी नवं राज्य’ या जुन्या मालिका बंद झाल्यानंतर ‘झी मराठी’वर दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मनसोक्त हसणारी ‘पारू’ आणि बिनधास्त जगणारे ‘शिवा’… दोन भिन्न स्वभाव, दोन नव्या गोष्टी…एक ‘पारू’ आणि दुसरी ‘शिवा’ अशा दोन नव्या मालिका ‘झी मराठी’वर लवकरच सुरू होणार आहे.