अभिनेत्री अदिती द्रविड हिने आतापर्यंत विविध मालिकांमधून तिच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली. ती ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत झळकली. या मालिकेत तिने नंदिनी हे पात्र साकारलं होतं. तर आता या मालिकेसाठी तिला किती मानधन मिळालं हे तिने सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : “लोक इतकी नजर लावतात…”, ‘बाईपण भारी देवा’ फेम अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत, म्हणाली, “आयुष्यात…”

अदिती सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते. तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी ती सोशल मीडियावरून शेअर करत असते. तर आता तिचा तिच्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनीथिंग’ हे सेशन घेतलं. या सेशनदरम्यान तिने तिच्या चाहत्यांच्या बऱ्याच प्रश्नांना उत्तर दिली.

हेही वाचा : ‘या’ लोकप्रिय मराठी अभिनेत्रीची नवी इनिंग! व्यवसाय क्षेत्रात केलं पदार्पण; म्हणाली, “गेली ३ वर्षं…”

या सेशनमध्ये एका चाहत्याने तिला विचारलं, “सुंदरा मनामध्ये भरली मालिकेसाठी तुला मानधन किती मिळालं?” त्यावर अदितीने चतुराईने उत्तर दिलं. या मालिकेतील कलाकारांबरोबरचा एक फोटो शेअर करत तिने लिहिलं, “सुंदरा ची माझी कमाई.” तर आता तिने दिलेल्या या उत्तराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress aditi dravid reveals about her payment for sundara manamadhe bharli serial rnv
Show comments