अभिनेत्री अदिती सारंगधर ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री आहे. आतापर्यंत तिने अनेक मालिकांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवली आहे. तिच्या कामाबरोबर असती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. आता तिच्याबद्दलचं एक गुपित तिने उघड केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अदितीचा चाहतावर्ग मोठा आहे. अदिती ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. आता ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत तिने काही वर्षांपूर्वी एका क्रिकेटरला प्रपोज केलं होतं असा खुलासा केला आहे.

आणखी वाचा : “…अन् लग्नानंतर आमचं पहिलं भांडण हायवेवर झालं होतं”, मराठी अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ किस्सा

अदिती म्हणाली, “मी पहिल्यांदा प्रपोज अजित आगरकरला केलं होतं. मला तो खूप आवडायचा. ब्रेबर्न स्टेडियमच्या बाहेर मी त्याच्यासाठी तासान् तास थांबायचे. मी त्याच्यासाठी खूप पत्र लिहायचे आणि आईला द्यायचे. आई म्हणायची मी पोस्ट करते. त्या पत्रांपैकी एका पत्रामध्ये मी त्याला लव्ह लेटर लिहिलं होतं. मला तू खूप आवडतोस आणि मला तुझ्याबरोबर डेटवर जायचं आहे असं मी त्या पत्रात लिहिलं होतं. मी त्याला लग्नासाठी वगैरे प्रपोज केलं नव्हतं. आई म्हणायची मी तुझी पत्र देते पण एक दिवस मला माझा खण आवरताना ती सगळी पत्र त्यात मिळाली. आईने ती पत्र पोस्ट केलीच नव्हती. त्यामुळे ते डेट प्रपोजल माझ्याकडेच राहिलं.”

हेही वाचा : “मला तो प्रचंड आवडतो आणि…,” क्रशचं नाव सांगत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबने व्यक्त केली मनातली इच्छा

दरम्यान, सध्या अदिती ‘चर्चा तर होणारच’ या नाटकामधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या तिच्या नाटकाला आणि यातील तिच्या कामाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.