‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतून दररोज प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या कामाबरोबरच सोशल मीडियावरील पोस्टमुळे ऐश्वर्या नारकरांची चर्चा कायम रंगलेली असते. अनेकदा त्यांना ट्रोल केलं जातं, पण त्या ट्रोलर्सना अभिनेत्री सडेतोड उत्तर देतात. पण दुसऱ्या बाजूला त्यांच्यावर प्रेम करणारा चाहता वर्ग देखील तितकाच मोठा आहे.
ऐश्वर्या नारकरांचे सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून जितकं त्यांना ट्रोल केलं जातं तितकंच त्यांचं कौतुक केलं जातं. पन्नाशीतही त्यांची एनर्जी, उत्साह, सौंदर्य तरुणाईला लाजेवल असं आहे. सध्या ऐश्वर्या नारकरांचा एक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे. या व्हिडीओतील त्यांच्या मनमोहक सौंदर्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
हेही वाचा – Video: प्रथमेश परब आणि किशोरी शहाणेंचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, “अरे व्वा…”
काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या नारकरांनी सोशल मीडियावर ट्रेंड होतं असलेलं अरिजीत सिंहच्या ‘सजनी’ गाण्यावर व्हिडीओ केला होता. या व्हिडीओत त्या पांढऱ्या रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत होत्या. त्यामुळेच ऐश्वर्या नारकरांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांचं मनमोहक सौंदर्य पाहून व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा पाऊस पडला आहे.
इतर कलाकार मंडळींसह नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “काश तुम्हें पाने के लिए कोई चुनाव होता. मैं भाषण के साथ साथ दंगे भी करा देता.” यावर अभिनेत्री म्हणाल्या, “दंगे तो अच्छे नही.” तेव्हा तो नेटकरी म्हणाला, “आपके लीये कुछ भी.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “तुम्ही नैसर्गिक सौंदर्याची खरी व्याख्या आहात.” तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “तुम्ही खूपच छान दिसताय.” चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं, “आई गं, विरोचक किती छान आहे.”
दरम्यान, ऐश्वर्या नारकरांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, त्या सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत काम करत आहेत. या मालिकेत त्यांनी अद्वैत म्हणजेच अभिनेता अजिंक्य ननावरेच्या आई रुपाली म्हात्रेची भूमिका साकारली आहे. ऐश्वर्या नारकरांची ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. आता या भूमिकेद्वारे त्यांना ओळखलं जात आहे. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत ऐश्वर्या नारकरांशिवाय अभिनेत्री तितीक्षा तावडे, श्वेता मेहेंदळे, मुग्धा गोडबोले, राहुल मेहेंदळे, विवेक जोशी, अनिरुद्ध देवधर, प्रशांत केणी, एकता डांगर असे बरेच कलाकार पाहायला मिळतात.