ऐश्वर्या नारकर हे मराठी मालिका, नाटक, चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव आहे. सध्या त्या झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर नकारात्मक भूमिका साकारत आहेत. ऐश्वर्या नारकर यांनी नुकतंच शॉर्ट परिधान केलेला एक फोटो शेअर केला होता. त्यावरुन त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. नुकतंच त्यांनी यावर सडेतोड उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या नारकर यांनी शॉर्ट्स परिधान एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोवर काही नेटकऱ्यांनी कमेंट करत ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. तुम्ही छोटे कपडे कसे घालता? म्हातारवयात हे धंदे कसे सुचतात? अशा अनेक कमेंट काहींनी केल्या होत्या. एका मुलाखतीत त्यांना याबद्दल विचारण्यात आले. त्यावर त्यांनी भाष्य केले.
आणखी वाचा : “माझी पन्नाशी उलटलेली नाही पण…” वयाबद्दलच्या प्रश्नावर ऐश्वर्या नारकर यांचा खुलासा

ऐश्वर्या नारकर काय म्हणाल्या?

“मी आतापर्यंत कधीही शॉर्ट्स घातली नव्हती. कॉलेजमध्ये असताना मी कधी जीन्स देखील घातली नव्हती. आता कुठे मी स्लिव्हलेस ब्लाऊज घालायला लागले आहे. मला ज्या कपड्यात योग्य वाटतं, ते कपडे मी घालते. त्यादिवशी मी शॉर्ट्स घातली, तेव्हा मला फार कम्फर्टेबल वाटत होतं.

मी गेल्या १८ ते २० वर्षांपासून योगा करते. आता कुठे मी माझी लाइफस्टाइल लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. मला असं वाटतं की ज्याला ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल वाटतं, त्याने ते कपडे घालायला काहीच हरकत नाही. त्यामुळे अशा कमेंट्स करुन उगाचच आपली शक्ती वाया घालवू नका. जर तुम्हाला आवडत नसेल तर अनफॉलो करण्याचा ऑप्शन तुमच्याकडे असतो किंवा आम्हाला हे आवडलं नाही, असंही तुम्ही चांगल्या भाषेत सांगू शकता. त्यामुळेच उगाचच दुसऱ्याला ट्रोल करण्यात वेळ वाया घालवू नका.

आपल्याला त्यात काय चांगलं घेता येईल ते पाहावं. ज्या वेळेला आपण एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो तेव्हा उरलेली चार बोटं ही आपल्याकडे असतात. आपण किती फिट आहोत हे बघणं महत्वाचं आहे. मला हे करण्यात फिजिकली छान वाटतंय, त्यामुळे मी काही वेगळं करतेय असं मला वाटत नाही मला ती शॉर्टस वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून मिळाले होते. मी ते फोटो पोस्ट करणारही नव्हते, पण मला ते चांगले आणि योग्य वाटले, म्हणून मी ते पोस्ट केले होते. आता आयुष्यातली ५० वर्षे गेलीत, उरलेली किती हातात आहेत ते माहीत नाही. पण जे आहे त्यात आनंदी राहावं अशी माझी इच्छा आहे”, असेही ऐश्वर्या नारकर यांनी यावेळी म्हटले.

ऐश्वर्या नारकर यांना मराठी सिनेसृष्टीतील अतिशय साध्या आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. त्या अनेकदा साडी, चुडीदार ड्रेस, केसांची लांब वेणी असा लूक परिधान करत फोटोशूट करत असतात. त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे.त्या सोशल मीडियावर त्यांच्या फिटनेसचे व्हिडीओही शेअर करताना दिसतात. सध्या त्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत काम करत आहेत.