ऐश्वर्या नारकर हे मराठी मालिका, नाटक, चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव आहे. सध्या त्या झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर नकारात्मक भूमिका साकारत आहेत. सोशल मीडियावर सक्रिय राहून त्या त्यांच्या चाहत्यांशी संपर्कात राहत असतात. त्यांच्या कामाबरोबरच त्या त्यांच्या सोशल मीडियावरील फोटोंमुळे देखील सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात. मध्यंतरी त्यांनी शॉर्ट्स परिधान करून फोटो पोस्ट केले होते. आता त्यांनी तेव्हा रंगलेल्या चर्चांबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

ऐश्वर्या नारकर यांनी नुकतीच ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्याला हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्याची या वर्षीची टॅगलाईन आहे “चर्चा रंगणार, बातमी वाजणार.” यानिमित्त त्यांनी ‘मज्जा’ या यूट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली. यात त्यांनी शॉर्ट्स परिधान केल्यानंतर रंगलेल्या चर्चांवर भाष्य केलं.

little girl lavni dance in nauvari saree on marathi song Mala Pirtichya Jhulyat Jhulwa video goes viral
“मला पिरतीच्या झुल्यात झुलवा अन् इश्काचा गुलकंद खिलवा” गाण्यावर चिमुकलीची जबरदस्त लावणी; काय ती ‘कातील अदा’ VIDEO एकदा पाहाच
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
Dance video Uncle aunty dance went viral on social media
काका काकूंचा नादच खुळा! भर कार्यक्रमात बॉलीवूड गाण्यावर दोघांनी धरला ठेका, VIDEO एकदा पाहाच
Marathi ukhana newly married wife took ukhana in front of laws funny ukhana went viral on social media
“मी चिरेन भाजी आणि हे लावतील कुकर”, नव्या नवरीचा उखाणा ऐकून पोट धरून हसाल, पाहा VIDEO
Young man dances on madanmajiri song from phullwanti marathi movie video viral on social media
“ती नजर, ती अदा…”, प्राजक्ता माळीच्या मदनमंजिरी गाण्यावर थिरकला तरुण, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल चकीत
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”
Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल

आणखी वाचा : Video: रश्मिका मंदानाला पाहून श्रेयस तळपदे फिदा; म्हणाला, “सिर्फ मेरेकु देखि नहीं…”

“यावर्षी तुमची कुठली अशी बातमी आहे जी खूप गाजली?” असं विचारल्यावर त्या म्हणाल्या, “माझ्याबद्दल खूप चर्चा रंगली आहे. मी शॉर्ट्स घालून सोशल मीडियावर फोटो केले होते. मी पहिल्यांदाच शॉर्ट्समधले टाकले होते आणि मी शॉर्ट्सही पहिल्यांदाच घातली होती. त्याची खूप चर्चा रंगली आणि मला खूप मजा आली.”

हेही वाचा : “माझी पन्नाशी उलटलेली नाही पण…” वयाबद्दलच्या प्रश्नावर ऐश्वर्या नारकर यांचा खुलासा

त्यांनी त्यांचे शॉर्ट्समधले फोटो पोस्ट केल्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. काहींनी त्यांच्या या स्टाईलच कौतुक केलं तर काहींनी त्यांना ट्रोलही केलं होतं. त्यावर “ज्याला ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल वाटतं, त्याने ते कपडे घालायला काहीच हरकत नाही. त्यामुळे अशा कमेंट्स करुन उगाचच आपली शक्ती वाया घालवू नका. जर तुम्हाला आवडत नसेल तर अनफॉलो करण्याचा ऑप्शन तुमच्याकडे असतो किंवा आम्हाला हे आवडलं नाही, असंही तुम्ही चांगल्या भाषेत सांगू शकता,” असा एका मुलाखतीत म्हणत त्यांनी ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं होतं.

Story img Loader