एव्हरग्रीन कपल म्हणून ओळखले जाणारे अविनाश नारकर व ऐश्वर्या नारकर यांची जोडी नेहमी चर्चेत असते. अभिनयाबरोबर ही जोडी सोशल मीडियावरील पोस्टमुळेही सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. ते अनेकदा त्यांच्या पोस्टमधून एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त करत असतात. आता ऐश्वर्या नारकर यांनी अविनाश नारकर यांच्यासाठी एक खास पोस्ट लिहीत त्यांच्यातलं नातं उलगडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्या दोघांचं एक रील शेअर केलं. या रीलमध्ये टे दोघं “वी आर बेस्ट फ्रेण्ड्स” असं म्हणताना दिसत आहेत. ही रील शेअर करत ऐश्वर्या नारकर यांनी अविनाश नारकर यांच्यासाठी एक खास कॅप्शन लिहिली.

आणखी वाचा : “मी पहिल्यांदा शॉर्ट्स घातली आणि…” ऐश्वर्या नारकर यांनी रंगलेल्या चर्चंबाबत केलं भाष्य

हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिलं, “आता २५ हून अधिक वर्षं झाली…त्याने नेहमीच मला पाठिंबा दिला. ज्या गोष्टी मी करू शकेन की नाही असं मला वाटत असताना त्याने मला त्या करायला प्रोत्साहन दिलं. मला स्वतःचा शोध घ्यायला मदत केली. काही बाबतीत आमची मतं वेगळी असली तरीही आम्ही प्रत्येक क्षण एन्जॉय करतो. यालाच आनंदी आयुष्य म्हणतात. मला माहीत आहे की मित्र म्हणून तू नेहमी माझ्याबरोबर होतास, आहेस आणि यापुढेही असणार आहेस. न संपणारी मैत्री…”

हेही वाचा : Video: “एकाही पैशाचा मोबदला न घेता त्यांनी…”, ‘लोकमान्य’ मालिका संपताच स्पृहा जोशीने सांगितली पडद्यामागची गोष्ट

आता त्यांची ही पोस्ट त्यांच्या चाहत्यांनाखूप आवडली असून त्यांच्यात असलेल्या या बॉंडिंगचं सर्वजण सोशल मिडियावरून कौतुक करत आहेत.