मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून ते दोघेही प्रसिद्धीझोतात आले. काही महिन्यांपूर्वीच त्या दोघांचा लग्नसोहळा थाटात पार पडला. त्यानंतर आता आता जोशी आणि देवधर कुटुंबियांनी मिळून अक्षयाची पहिली मंगळागौर थाटामाटात साजरी केली आहे. त्याचे काही फोटो आता समोर आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अक्षयाने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिचे आणि हार्दिकचे मंगळागौर कार्यक्रमादरम्यानच काही फोटो पोस्ट केले आहेत. यात अक्षया आणि हार्दिक हे भगवान शंकराच्या पिंडीवर फुल वाहताना दिसत आहेत. तर एका फोटो ते दोघेही हात जोडून नमस्कार करताना दिसत आहे.
आणखी वाचा : “मी सई ताम्हणकरची मैत्रीण होण्याचा प्रयत्न केला, पण…” अमृता खानविलकर स्पष्टच बोलली

यावेळी अक्षयाने हिरव्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती. त्याबरोबर तिने साजश्रृंगारही केला होता. तर हार्दिकने सोनेरी रंगाचा कुर्ता आणि हिरव्या रंगाचं धोतर परिधान केले होते.

आणखी वाचा : “प्रसिद्धीसाठी वापर, पॉकेटमनी अन्…”, मानसी नाईकने सांगितली लग्न व घटस्फोटाची संपूर्ण कहाणी; म्हणाली “त्यांच्या घरी धुणी-भांडी”

या फोटोला अक्षयाने हटके कॅप्शन दिले आहे. “पहिल्या मंगळागौरीची हौस!” असे कॅप्शन अक्षयाने या फोटोला दिले आहे. दरम्यान त्यांचे हे फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. यावर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत.