‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. त्या दोघांच्या घरी सध्या लगीनघाई सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या केळवणाचे आणि बॅचलर पार्टीचे फोटो समोर आले होते. त्यानंतर आता अक्षया देवधरचा नववधूच्या वेशातील एक व्हिडीओ समोर आला आहे.

अक्षया देवधर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. “तुम्ही मला नववधूच्या वेशात पाहण्यासाठी उत्सुक आहात का?” असा प्रश्न तिने कॅप्शनद्वारे चाहत्यांना विचारला आहे.
आणखी वाचा : “आईचा हट्ट, लग्नाची मागणी ते साखरपुडा…” ‘अशी’ सुरु झाली राणादा आणि पाठकबाईंची लव्हस्टोरी

अक्षयाने शेअर केलेल्या या व्हिडीओत ती निळ्या रंगाच्या साडीत दिसत आहे. यावर तिने छान मोत्यांचे दागिनेही परिधान केले आहेत. त्याबरोबर तिच्या हातात हिरवा चुडाही पाहायला मिळत आहे. तसेच तिने छान मोत्याची नथही नाकात घातली आहे. याबरोबर तिच्या हातावर छान मेहंदीही रंगल्याचे दिसत आहे. तिने या पोशाखाला साजेसा मेकअप आणि हेअरस्टाईलही केली आहे. त्याबरोबर तिने केसात गजराही माळल्याचे दिसत आहे.

आणखी वाचा : “दहा दिवस शिल्लक असताना…” राणादा आणि पाठकबाईंच्या गुपचूप साखरपुडा करण्यामागचे कारण समोर

अक्षयाच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. ‘किती गोड आहात तुम्ही वहिनी’, अशी कमेंट तिच्या एका चाहत्याने केली आहे. ‘लय भारी आणी खुप छान दिसताय बघा तुम्ही’, असे एकाने म्हटले आहे. ‘आम्ही फार उत्सुकतेने लग्नाची वाट पाहतोय’, अशी कमेंटही एका व्यक्तीने केली आहे.

दरम्यान छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या या जोडीने अक्षय्य तृतीयादिवशी साखरपुडा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. याचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नपत्रिकेचे फोटोही समोर येत आहे. मात्र त्यांच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आली नाही. मात्र तिच्या या व्हिडीओनंतर ते दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे पाहायला मिळत आहे.

Story img Loader