हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांची जोडी मराठी मनोरंजनविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. दोघंही ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेपासून प्रसिद्धीझोतात आले. हार्दिक-अक्षयाची लग्नानंतरची ही पहिली मंगळागौर नुकतीच थाटामाटात पार पडली. त्यांच्या मंगळागौर समारंभाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. मंगळागौरीच्या कार्यक्रमात अक्षयाने लाडक्या नवऱ्यासाठी खास उखाणा घेतला. या उखाण्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
हेही वाचा : “मंगळसूत्रात ओवले काळे मणी…”, मंगळागौरीला सुपर्णा श्यामचा संकेत पाठकसाठी खास उखाणा
अक्षयाने मंगळागौरीसाठी विशेष तयारी केली होती. पूजेसाठी तिने खास हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. हिरव्या बांगड्या, भरजरी दागिने, नाकात नथ, केसात गजरा असा पारंपरिक शृंगार अभिनेत्रीने केला होता. तसेच अक्षयाने दुसरी साडी सोनेरी रंगाची नेसली होती. हार्दिकने पत्नीला मॅचिंग असेल असा कुर्ता परिधान केला होता. जोशी आणि देवधर कुटुंबीयांनी मिळून अक्षयाची पहिली मंगळागौर मोठ्या उत्साहात साजरी केली.
मंगळागौरीच्या कार्यक्रमात अक्षयाने हार्दिकसाठी खास उखाणा घेतला. ती म्हणाली, “पावसाळा संपत आला…येईल आता हिवाळा, हार्दिकरावांचं नाव घेते मंगळागौरीच्या कार्यक्रमात छान पार पडला मानसीचा सोहळा” अक्षयाने उखाण्यामध्ये नवऱ्यासह मानसी कानेटकर या तिच्या खास मैत्रिणीचं नावही घेतलं आहे.
अक्षयाचा उखाणा ऐकून हार्दिकसह सर्वांनी तिचं टाळ्या वाजवून कौतुक केलं. नेटकऱ्यांनी सुद्धा या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान, ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत दोघांनीही एकत्र काम केलं होतं. या मालिकेतील राणादा आणि पाठकबाईंच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.