मराठी कलाविश्वातील असंख्य कलाकारांनी हिंदी मालिका व चित्रपटांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठमोळी लोकप्रिय अभिनेत्री आणि अभिनेता सुयश टिळक याची पत्नी आयुषी भावे-टिळक लवकरच लोकप्रिय हिंदी मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. आयुषीने यापूर्वीही हिंदी कलाविश्वात काम केले आहे.

हेही वाचा : हेमा मालिनी आणि अमिताभ यांच्या केमिस्ट्रीमुळे धर्मेंद्र यांनी ‘बागबान’ पाहण्यास दिला होता नकार? अभिनेत्री म्हणाल्या, “मला याबाबत…”

Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
marathi actress hemal ingle kelvan photos
थायलंडला बॅचलर पार्टी, कोल्हापुरात केळवण! मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई; फोटो आले समोर
manasi moghe marathi actress announces pregnancy
मराठमोळी अभिनेत्री लवकरच होणार आई! नवरा आहे लोकप्रिय हिंदी अभिनेता, २०१३ मध्ये झालेली मिस Diva युनिव्हर्स
Anurag Kashyap Daughter Haldi Ceremony
वयाच्या २३ व्या वर्षी अनुराग कश्यपची लेक अडकणार विवाहबंधनात! हळदीला सुरुवात, होणारा जावई कोण?
deepika padukone visited diljit dosanjh concert
Video : दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये दीपिका पादुकोणने घेतली एन्ट्री; व्हायरल व्हिडीओमध्ये गाण्यांवर थिरकताना दिसली अभिनेत्री
amber heard to be mother second time
घटस्फोटाच्या खटल्यामुळे जगभर राहिली चर्चेत; प्रसिद्ध अभिनेत्री लग्न न करताच दुसऱ्यांदा होणार आई

गेल्या काही दिवसापांसून ‘नीरजा – एक नई पहचान’ या ‘हिंदी कलर्स’ वाहिनीवरील मालिकेची चांगलीच चर्चा सुरु आहे. या मालिकेत आयुषी भावे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या बालकलाकार मायरा वायकुळ मालिकेत ‘नीरजा’च्या बालपणीची व्यक्तिरेखा साकारत असून, नीरजा मोठी झाल्यावर प्रेक्षकांना या भूमिकेत अभिनेत्री आस्था शर्मा दिसेल. आयुषीची एण्ट्री मालिकेत ‘नीरजा’ मोठी झाल्यावर होणार आहे. ती मालिकेत ‘मुनमुन’ हे नीरजाच्या वहिनीचे पात्र साकारणार आहे.

हेही वाचा : “मला ते सहन करावं लागतं”, अमृता फडणवीसांनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; म्हणाले “माझी पत्नी…”

आयुषी भावेने ‘लोकसत्ता’शी संवाद साधताना तिच्या भूमिकेबाबत माहिती दिली. अभिनेत्री म्हणाली, “‘नीरजा – एक नई पहचान’ मालिकेत मी नीरजा मोठी झाल्यावर तिच्या वहिनीची म्हणजेच ‘मुनमुन’ ही भूमिका साकारणार आहे. ‘मुनमुन’ चे पात्र काहीसे विनोदी आणि नकारात्मक असेल, पण प्रत्यक्षात ती फार हुशार असते. नीरजा आणि अबीर यांच्या प्रेमकहाणीत अडथळे आणण्याचे काम मुनमुन करणार आहे. किचन पॉलिटिक्स, घरातील सत्ता कोणाकडे जाणार? यामध्ये मुनमुन जास्त सहभागी असेल.” तसेच ‘नीरजा – एक नई पहचान’ या मालिकेबाबत ती प्रचंड उत्सुक असल्याचे तिने सांगितले.

हेही वाचा : “ट्रेलरपेक्षा वाईट” रणवीर सिंह आणि आलिया भट्टचे ‘झुमका’ गाणे ऐकून नेटकरी भडकले; म्हणाले, “जुन्या गाण्याची पुन्हा…”

दरम्यान, अलीकडेच आयुषीने तिचा वाढदिवस साजरा केला. इन्स्टाग्राम पोस्ट, स्टोरीज शेअर करत तिने तिच्या नव्या मालिकेबाबत प्रेक्षकांना माहिती दिली. लाडक्या बायकोच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता सुयश टिळकनेही खास पोस्ट शेअर करत आयुषीला शुभेच्छा दिल्या होत्या.

Story img Loader