हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा असलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे नेहमी चर्चेत असते. कधी वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी व्यावसायिक आयुष्यामुळे अंकिता चर्चेचा विषय असते. सध्या अंकिताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता ‘सैलाब’ चित्रपटातील धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या कोळी लूकमध्ये हुबेहुब दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या समिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री अंकिता लोखंडेचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत अंकिता ‘सैलाब’ चित्रपटातील ‘हमको आज कल है इंतज़ार’ गाण्यामधील माधुरी दीक्षितसारख्या कोळी लूकमध्ये दिसत आहे. पिवळ्या रंगाचा ब्लाऊज आणि हिरव्या नऊवारी साडीत ती पाहायला मिळत आहे. अंकिताचा हा व्हिडीओ ‘डान्स दीवाने’च्या सेटवरील आहे.

हेही वाचा – Video: गौतमी पाटीलसह झळकणार ‘बिग बॉस’ फेम अभिनेता, व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या कमेंट्स पाऊस, म्हणाले, “एकदम भारी…”

माधुरी दीक्षितचा वाढदिवस काही दिवसांवर आहे. त्यानिमित्ताने ‘डान्स दीवाने’मधील स्पर्धेक माधुरीला ट्रिब्यूट देणार आहेत. तिच्या लोकप्रिय गाण्यावर जबरदस्त डान्स पाहायला मिळणार आहेत. अंकिता लोखंडेचा देखील परफॉर्मन्स होणार आहे. त्यामुळेच अंकिता माधुरी दीक्षितसारख्या हुबेहुब लूकमध्ये पाहायला मिळाली. अंकिताचा हा व्हिडीओवर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. काही नेटकऱ्यांनी तिच्या लूकचं कौतुक केलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे.

हेही वाचा – कृष्णा अभिषेकवर ‘या’ कारणाने नाराज आहे मामा गोविंदा; म्हणाला, “तो मुलाखतीत वारंवार म्हणतोय की…”

एका नेटकऱ्याने लिहिलं, “हिच्यापेक्षा माधुरी सुंदर दिसते. हिची तुलना करणं योग्य नाही.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “हिची तुलना करू नका.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “पण खरंच ही खूपच सुंदर दिसतेय.” चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “मीशोवरून माधुरीला मागवली आहे का?” पाचव्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “गरीबांची माधुरी.”

हेही वाचा – Video: ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्रीची ‘शुभविवाह’ मालिकेत एन्ट्री, झळकणार महत्त्वाच्या भूमिकेत

दरम्यान, अंकिताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अलीकडेच ती रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिने स्वातंत्र्यवीर सावरकरांची पत्नी यमुनाबाई सावरकरांची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील अंकिताच्या कामाचं खूप कौतुक झालं. माहितीनुसार, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटातील भूमिकेसाठी अंकिताने एकही रुपया मानधन घेतलं नव्हतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress ankita lokhande dressed up as madhuri dixit video viral pps