अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या वडिलांचे निधन झाले आहे. तिचे वडील शशिकांत लोखंडे यांनी ६८ व्या वर्षी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. अंकिताच्या वडिलांच्या मृत्यूचे कारण सध्या समजू शकलेले नाही, मात्र ते मागच्या काही दिवसांपासून आजारी होते असं बोललं जातंय. त्यांचं निधन १२ ऑगस्टला सायंकाळी झालं. अंकिताचे वडील व्यवसायाने बँकर होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सीमा हैदरला चित्रपटात काम देण्यावरुन मनसे आक्रमक; अमेय खोपकर म्हणाले, “हे असले तमाशे…”

अंकिताच्या वडिलांचा मृतदेह त्यांच्या इंटरफेस अपार्टमेंटमध्ये अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (१३ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता ओशिवरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, अंकिता तिच्या वडिलांच्या खूप जवळ होती. ती अनेकदा त्यांच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असायची. वडिलांच्या निधनाने तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सध्या या दु:खाच्या काळात कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहेत.

“आईने मला रामायण व महाभारत या मालिका दाखवल्या नाहीत कारण…” कोंकणा सेन शर्माचं वक्तव्य चर्चेत

अंकिताने फादर्स डेनिमित्त तिचे वडील शशिकांत लोखंडे यांच्यासाठी खास पोस्ट लिहिली होती. फोटो शेअर करत अंकिताने लिहिलं, “माझे पहिले हिरो माझे वडील आहेत. मला तुमच्याबद्दल जे वाटते त्या भावना मी नीट व्यक्त करू शकत नाही. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. बाबा, मी तुम्हाला अनेक गोष्टींसाठी संघर्ष करताना पाहिले आहे. मी लहान असतानाही तुमचा संघर्ष पाहत होते. पण तुम्ही तुमच्या मुलांना कधीही संघर्ष करू दिला नाही. तुम्ही आम्हाला सर्व काही दिलं. जेणेकरून मला आयुष्यात जे काही करायचे आहे ते मी करू शकेन.”

अंकिताने २००९ मध्ये एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या शोमध्ये ती दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत दिसली होती. अर्चनाच्या भूमिकेतून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. यानंतर तिने ‘कॉमेडी सर्कस’, ‘एक थी नायक’ आणि ‘झलक दिखला जा’ असे अनेक शो केले.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress ankita lokhande father shashikant lokhande passed away in mumbai hrc
Show comments