Ankita Lokhande Birthday: हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा असलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे नेहमी चर्चेत असते. कधी वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी व्यावसायिक आयुष्यामुळे अंकिता चर्चेचा विषय असते. आज अंकिता लोखंडेचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने कलाकार मंडळींसह चाहते तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. अंकिताची सासू रंजना जैन यांनी खास सूनेसाठी पत्र लिहिलं आहे. हे पत्र अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री अंकिता लोखंडेची सासू रंजना जैन या खूप लोकप्रिय आहेत. ‘बिग बॉस’मुळे त्या प्रसिद्धीझोतात आल्या. अंकिता आणि विकी जैन ‘बिग बॉस’मध्ये असताना सासू रंजना जैन यांच्या प्रतिक्रिया खूप व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे अंकिता इतकीच तिच्या सासूबाई चर्चेत असतात.

हेही वाचा – ती पुन्हा येतेय! अभिजीत आमकर-शर्वरी जोगच्या ‘तू ही रे माझा मितवा’ नव्या मालिकेत ‘स्टार प्रवाह’चा जुना लोकप्रिय चेहरा झळकणार

अंकिताच्या वाढदिवसानिमित्ताने रंजना जैन यांनी खास पत्र लिहिलं आहे. “माझ्या लाडक्या सूनेला, तुझा हा वाढदिवस तू या कुटुंबासाठी घेऊन आलेल्या आनंद इतका आनंद घेऊन येवो. एका अशा सूनेला, जी मुलीप्रमाणे आहे, तिला जगातील सर्व प्रेम मिळो. मला तुझी सासू असल्याचा खूप अभिमान आहे. आमच्या संपूर्ण कुटुंबाकडून तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तुझीच सासू,” असं रंजना यांनी लिहिलं आहे.

हे छोटंस पत्र शेअर करत अंकिताने लिहिलं की, “हा संदेश माझ्यासाठी सर्वकाही आहे. माझा दिवस अजून सुंदर केल्याबद्दल धन्यवाद मम्मा…” अंकिताच्या सासूबाईचं हे छोटंस पत्र चांगलंच व्हायरल झालं आहे.

हेही वाचा – Video: “बाई हा काय प्रकार”, ‘बिग बॉस मराठी’ फेम योगिता चव्हाणचा डान्स पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…

हेही वाचा – ‘सुंदरा मनामध्ये भरली’मधील लतिका आणि अभिमन्यू पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीस; कधी, कुठे जाणून घ्या…

दरम्यान, दिवंगत सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता सिंह कीर्तिने अंकिताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अंकिताच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत श्वेताने लिहिलं, “माझ्या प्रिय व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तू नेहमी आनंदी, निरोगी रहावी, अशी इच्छा व्यक्त करते. भावाचं प्रेम आणि आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी असेल.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress ankita lokhande mother in law ranjana jain wishes her birthday in special note pps