‘पवित्र रिश्ता’ फेम अंकिता लोखंडे ही नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. तिने डिसेंबर २०२१ मध्ये विकी जैन याच्याशी लग्न केलं. अंकिता-विकीचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला होता. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या लग्नाला १ वर्ष पूर्ण झालं आहे. आता अशातच गेले काही दिवस ती गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता स्वतः अंकितानेच यावर मौन सोडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विकीशी लग्न केल्यावर काही महिन्यातच तिचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. त्या फोटोंमध्ये तिने परिधान केलेले ढगळ कपडे पाहून ती गरोदर असल्याचा नेटकरी म्हणू लागले होते. बरेच दिवस या चर्चा सुरू होत्या. आता अखेर अंकितानेच यावर भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : गेली ३४ वर्ष पत्नीपासून घटस्फोट न घेता वेगळे राहतात रणधीर कपूर; ‘हे’ ठरलं मतभेदाचं कारण

पिंकविलाशी बोलताना ती म्हणाली, “आधी माझ्या लग्नाबद्दल चर्चा रंगू लागल्या होत्या, त्यानंतर प्रेग्नंन्सी आणि मग आमचा घटस्फोट होणार असं लोक बोलू लागले होते. पण या सगळ्या बोलण्याने मला काही फरक पडत नाही. लोक त्यावर बोलतील, पण जोपर्यंत ते चांगले बोलतात तोपर्यंत ठीक आहे. जेव्हा ते त्रासदायक गोष्टी बोलतात तेव्हा माझ्यावर त्याचा थोडा परिणाम होतो. जर ते माझ्या प्रेग्नंन्सीबद्दल बोलले तर मला खूप आनंद होतो, कारण मी नक्कीच एक दिवस गरोदर राहीन आणि हे मी स्वतः सगळ्यांना सांगेन.”

हेही वाचा : अंकिता लोखंडे पहिल्यांदाच दिसणार मुख्य भूमिकेत, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटातील फर्स्ट लूक समोर

दरम्यान अंकिता लोखंडे सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घडामोडी तिचा चाहत्यांची शेअर करत असते. विकी जैनबरोबर ती सुखात असल्याचंही तिने सांगितलं. त्यामुळे आत्ता ती गरोदर नाही आणि तिचा घटस्फोटही होणार नाहीये हे स्पष्ट करत तिने सर्व अफवांना पूर्णविराम लावला.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress ankita lokhande opens up about her pregnancy rumours rnv