‘खतरों के खिलाडी’ हा शो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. गेली अनेक वर्षं हा कार्यक्रम चित्तथरारक स्टंट्सनी प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आतापर्यंत या कार्यक्रमाची १२ पर्वं पूर्ण झाली आहेत. तर आता सर्वांचं लक्ष या कार्यक्रमाच्या १३व्या पर्वाकडे लागलं आहे. या शोच्या शूटिंगला सुरुवात होताच यातील स्पर्धकांना दुखापतींचा सामना करावा लागत आहे. या शोच्या शूटिंग दरम्यान अभिनेत्री अर्चना गौतम हिला चेहऱ्याला दुखापत झाली असून जखमेला टाके घालावे लागले आहेत.

‘खतरों के खिलाडी’चं तेरावं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालं आहे. नुकतंच या पर्वाचं शूटिंग सुरू झालं. या पर्वाचं शूटिंग साउथ आफ्रिकेत होत आहे. यामध्ये हिंदी टेलिव्हिजनमधील अनेक आघाडीचे कलाकार स्पर्धक म्हणून दिसणार आहेत. यामध्ये अभिनेत्री अर्चना गौतमही स्पर्धक म्हणून दिसणार आहे.

आणखी वाचा : “किड्यांनी माझे प्रायव्हेट पार्ट्स…,” ‘खतरों के खिलाडी १३’च्या शूटिंगदरम्यान नायरा बॅनर्जीला गंभीर दुखापत; म्हणाली…

या शोमध्ये जिंकण्यासाठी अर्चना खूप मेहनत घेत आहे. तर एका टास्कदरम्यान आता तिला बरीच दुखापत झाली असल्याचं समोर आलं आहे. एका स्टंटदरम्यान तिला ही दुखापत झाली आणि त्यामध्ये तिच्या गुडघ्यांना आणि चेहऱ्याला लागलं. तिच्या चेहऱ्याच्या जखमा थोड्या खोल असल्याने त्यांना टाकेही घालावे लागले आहेत.

हेही वाचा : काय सांगता! ‘बिग बॉस १६’नंतर शिव ठाकरेने नाकारल्या २ मोठ्या मराठी चित्रपटांच्या ऑफर्स, कारण स्पष्ट करत म्हणाला…

अर्चनाला दुखापत झाल्याचं कळताच तिचे चाहते तिच्याबद्दल काळजी व्यक्त करत तिला काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. ‘खतरों के खिलाडी’चं हे आगामी पर्व लवकरच ‘कलर्स’वर सुरू होईल.

Story img Loader