‘द कपिल शर्मा शो’ मधील अभिनेत्री अर्चना पूरन सिंह सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नेहमी शोमधले काही व्हिडीओ व फोटो पोस्ट करत असते. नुकताच तिनं पती परमीतबरोबर एक फोटो इन्स्टाग्राम शेअर केला होता. या फोटोवरील एक कमेंट पाहून अभिनेत्रीचा पार चढलेला पाहायला मिळाला. अर्चनानं त्या कमेंटवर सडेतोड असं उत्तर दिलं; जे पाहून काही नेटकरी तिचं कौतुक करत आहे. तर काही नेटकरी तिला शांत होण्याचा सल्ला देत आहेत.

अभिनेत्री अर्चना पूरन सिंहने स्वित्झर्लंडमधील पतीबरोबर क्वालिटी टाईम स्पेंड करतानाचा फोटो इन्स्टाग्राम शेअर केला होता. आणि कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, “काही वेळापूर्वी आणि एक मिनिटापूर्वी!, गूगल नेहमी आयुष्य किती अद्भुत आहे, याची आठवण करून देतो. #गूगलफोटोज”

shweta kharat
“प्रत्येक माणसाबद्दल…”, ‘पारू’ फेम श्वेता खरातने सांगितला हर्षदा खानविलकर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाली…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
vidya balan distributes food and clothes to needy people video viral
Video: गरजूंना वाटले कपडे अन् वडापाव; बॉलीवूड अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “माणुसकी अजून जिवंत आहे”
Shahid Kapoor Mira Rajput
“तू ‘जब वी मेट’मधील आदित्य सारखा नाही…”; पत्नी मिरा राजपुतची तक्रार, शाहिद कपूर म्हणाला, “आनंदी हो…”
Meera Jaggnath
ज्याच्यासाठी साखरपुडा मोडला तो मुलगाच…; ‘ठरलं तर मग’फेम मीरा जगन्नाथने केला खुलासा; म्हणाली, “सहा महिन्यांनी…”
Marathi actress Tejashri Pradhan talk about social media
“फक्त हे मृगजळासारखं…”, सोशल मीडियाबाबत तेजश्री प्रधानने मांडलं मत; तरुणपिढीला सल्ला देत म्हणाली, “आपण आयुष्यात…”
Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”
Shahrukh Khan
“यावर्षी मी ६० वर्षांचा होईन, पण…”, शाहरुख खानचे वाढत्या वयाबाबत वक्तव्य; म्हणाला, “ज्या महिला…”

हेही वाचा – “१२ वर्षांची असताना थेरपीला पाठवलं,” आमिर खानची लेक इराचा आजारपणाचा अनुभव; म्हणाली, “कुटुंबीयांनी…”

अभिनेत्रीच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंटच्या माध्यमातून खूप सारं प्रेम व्यक्त करत आहेत. दोघांच्या जोडीला ‘मेड फॉर इच अदर’ असं म्हटलं आहे. पण याच्यातील एक नेटकरीच्या कमेंटमुळे अर्चना भडकली आहे. त्या नेटकरीनं लिहिलं आहे की, “स्त्री कमी, पुरुषासारखी जास्त दिसत आहेस. कपिल बरोबर बोलतो, तुला रुप बदलायला खूप वेळ लागला असेल.”

हेही वाचा – Video: गुलाबी कपडे घालून ‘बार्बी’ चित्रपट पाहण्यासाठी गेला लोकप्रिय गायक, नेटकरी ट्रोल करत म्हणाले, “मुलींना…”

हेही वाचा – “दिग्दर्शक ब्रेस्ट साइज विचारायचे अन्….” शर्लिन चोप्रानं सांगितला धक्कादायक अनुभव

ही कमेंट पाहताच अर्चनाचा पार चढला. तिनं त्या कमेंटवर लिहिलं की, “एवढ्या कमी वयात किती वाईट विचार करतेस. थोडं शिकली असतीस तर मोठ्याबरोबर कशाप्रकारे बोललं जातं, हे समजलं असतं. सर्व वयोगटातील स्त्रियांचा आदर करायला शिक. जर तुम्ही एक स्त्री असूनही इतर स्त्रियांचा आदर करू शकत नसालं, तर तुम्ही पुरुषांकडूनही आदराची अपेक्षा कशी काय करू शकता?”

अभिनेत्री अर्चना सिंहच्या या सडेतोड उत्तरानंतर इतर नेटकऱ्यांनी त्या नेटकरीला ट्रोल केलं. ज्यानंतर त्या नेटकरीनं आपली कमेंटचं डिलीट करून टाकली.

Story img Loader