‘आई कुठे काय करते’मध्ये अनघाची भूमिका साकारत अभिनेत्री अश्विनी महांगडे सर्वांचीच लोकप्रिय झाली. सध्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटात तिने साकारलेल्या भूमिकेमुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. अश्विनी नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. तिचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. आता तिने एक खास पोस्ट शेअर करीत तिच्या आयुष्याचा जोडीदार कोण हे सर्वांना सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अश्विनी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. विविध पोस्ट शेअर करीत ती तिच्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी, समाजातील तिला न पटणाऱ्या किंवा आवडणाऱ्या गोष्टी चाहत्यांशी शेअर करीत असते. आता नुकताच तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओनेही सर्वांचे लक्ष वेधले आहे.

आणखी वाचा : “केदार सरांनी जे सांगितले त्यानुसार…,” अश्विनी महांगडेने पोस्ट केलेला ‘महाराष्ट्र शाहीर’च्या सेटवरील फोटो चर्चेत; म्हणाली…

अश्विनीने चार फोटो एकत्र करून एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये तिच्याबरोबर तिचा जीवनसाथी दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करीत तिने लिहिले, “आधार देणाऱ्याचे मन निर्मळ असावे आणि ते अनेक संकटांमधून गेल्यावरच समजते…” तिला आधार देत कायम तिची साथ करणाऱ्या या तिच्या जोडीदाराचे नाव आहे नीलेश जगदाळे. नीलेश हे फार्मफ्रेश ऑरगॅनिक फ्रेशचे मालक आहेत. याबरोबरच त्यांनी अश्विनीसोबत मिळून ‘फ्लाइंग एन्जल लेट्स फ्लाय’ ही कंपनीदेखील सुरू केली आहे. तर ते ‘रयतेचे स्वराज्य’ प्रतिष्ठानचे सदस्यही आहेत. 

हेही वाचा : “राज्य नाट्य स्पर्धेसाठी वडिलांनी ज्यांच्या नाटकात काम केलं आज त्यांच्याच…” अश्विनी महांगडेची भावूक पोस्ट

यापूर्वी देखील अश्विनीने अनेकदा त्यांच्याबरोबरचे फोटो पोस्ट केले होते. पण आता हा व्हिडीओ शेअर करीत तिने त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले आहे. आता या व्हिडीओवर कमेंट करीत तिचे चाहते त्या दोघांची जोडी आवडल्याचे सांगत त्यांचे अभिनंदन करीत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress ashvini mahangade revealed about his life partner by sharing a video rnv