‘आई कुठे काय करते’मध्ये अनघाची भूमिका साकारत अभिनेत्री अश्विनी महांगडे सर्वांचीच लोकप्रिय झाली. अश्विनी नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. तिला समाजातील पटणाऱ्या किंवा न पटणाऱ्या गोष्टी ती अगदी बेधडकपणे मांडताना दिसते. आता तिची अशीच एक पोस्ट खूप चर्चेत आली आहे.

अश्विनी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. विविध फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते. तिच्या सगळ्याच पोस्ट लक्ष वेधून घेत असतात. याचं कारण म्हणजे तिच्या पोस्टमधून ती तिचे विचार मांडत असते. आता तिने एका पोस्टमधून गनिमी काव्याची आठवण करून दिली आहे.

Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
nana patole replied to devendra fadnavis
“आरएसएससुद्धा धार्मिक संघटना, मग त्यांनी…”; देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला नाना पटोले यांचे प्रत्युत्तर!
maori leader protest in newzealand
विधेयकाचा निषेध म्हणून महिला खासदाराचा ‘वॉर डान्स’; कुठल्या देशाच्या संसदेत घडला हा प्रकार?
Milind Gawali
“या पाच वर्षांत…”, ‘आई कुठे काय करते’मधील भूमिकेबद्दल मिलिंद गवळींचे मोठे वक्तव्य; म्हणाले, “अनिरुद्धला…”
Viral video of a daughter dancing in the hospital where her mother is admitted craze for reel
अशी मुलगी नसलेलीच बरी! आई रुग्णालयात दाखल असताना पोटच्या पोरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण

आणखी वाचा : Video: प्राजक्ता गायकवाडने खरेदी केलं नवीन घर, गृहप्रवेशाचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

अश्विनीने तिचा हात जोडलेला एक फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला. हा फोटो पोस्ट करत तिने लिहिलं, “तुमच्याबद्दल चांगले बोलणारे असतात तसे वाईट पसरवणारे सुद्धा असतातच. त्यांच्यासाठी एकच गोष्ट पुरेशी आहे ती म्हणजे तुमच्या नजरेतला विश्वास. कोणी वाईट असो वा चांगले सगळ्यांसमोर हात जोडणे आपली संस्कृती आहे आणि “गनिमी कावा” आपला इतिहास.” आता तिच्या या पोस्टवरती तिचे चाहते विविध प्रतिक्रिया देत अश्विनीची ही पोस्ट आवडल्याचं तिला सांगत आहेत.

हेही वाचा : ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाच्या टीमने पसरणी येथे केले शाहीर साबळे यांच्या फोटोचे अनावरण, पहा त्यावेळची खास क्षणचित्रे

दरम्यान गेल्या आठवड्यात शिवजयंतीच्या कार्यक्रमानिमित्त ती वाईला गेली होती तेव्हाचा हा फोटो असल्याचं तिने सांगितलं आहे. याचबरोबर तिने या कार्यक्रमाचे आणखी काही फोटोही शेअर केले आहेत. त्या सर्व फोटोंवरही नेटकरी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.