मनोरंजन क्षेत्रात काम करण्यासाठी आज देशभरातून कलाकार येत असतात. टीव्ही असो किंवा चित्रपट प्रत्येक कलाकार या क्षेत्रात काम करण्यासाठी धडपडत असतो. काही कलाकरांना चांगले अनुभव येतात तर काही जणांना वाईट अनुभव येतात. अभिनेत्री आयेशा कपूरने तिला आलेल्या अनुभवाबद्दल एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
आयेशाने ‘शेरदिल शेरगिल’ या मालिकेद्वारे पदार्पण केले आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या संघर्षकाळातील अनुभव सांगितले आहेत. विविध निर्मात्यांचे आली अनिभव तिने सांगितले आहेत. एका निर्मात्याने तर चक्क तिला लग्नाची मागणी घातली जर तिने मान्य केली तरच तिला काम देणार असं त्याने सांगितलं. स्पॉटब्वॉयला दिलेल्या मुलाखतीत तिने हा खुलासा केला. ती म्हणाली, “मला पहिल्यापासून अभिनेत्री व्हायचं होत, माझा प्रवास सरळ नाही सुरवातीला मला जे लोक भेटले त्यांनी मला चुकीचं सांगितलं. काही लोक स्वतःला कास्टिंग डायरेक्टर सांगायचे आणि मी त्यांच्या बोलण्यात यायचे.”
ती पुढे म्हणाली “मला नंतर कळले ही सगळी खोटी लोक आहेत मी यांच्यापासून लांब झाले आहे. मला अनेक वेबसीरिजच्या ऑफर येत होत्या, मात्र मला टीव्हीमध्ये करियर करायचे होते. वेबसीरीजमध्ये काम केल्यानंतर मला टीव्ही क्षेत्रात काम मिळाले. मला एक मोठं काम मिळालं होत ज्यात मला मुख्य भूमिका होती मात्र त्या निर्मात्याने एक अट ठेवली. ती अट अशी होती की जर मी त्या निर्मात्याबरोबर लग्न केले तर ती भूमिका मला मिळणार होती. “असं तिने सांगितले.