लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री चाहत खन्ना पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या अभिनेत्री तिसऱ्यांदा लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. ती अभिनेता रोहन गंडोत्रासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचं म्हटलं जात आहे. रोहन चाहतपेक्षा चार वर्षांनी लहान आहे. आता चाहत लवकरच रोहनशी तिसरं लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, अद्याप दोघांनीही याबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चाहत आणि रोहन यांनी आपलं नातं लपवून ठेवलं आहे. अभिनेत्रीच्या दोन्ही मुलींबरोबर रोहनचं चांगलं बॉन्डिंग आहे, असं म्हटलं जातं. सध्या दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. तसेच चाहत रोहनबरोबरचं नातं पुढे नेण्यास तयार असल्याचीही चर्चा आहे. दोघांच्या लग्नाच्या बातम्यांना उधाण आलं आहे, पण ते खरंच लग्न करणार का, हे जाणून घेण्यासाठी चाहत व रोहनच्या प्रतिक्रियेची वाट पाहावी लागणार आहे.

ऐश्वर्या नारकर पन्नाशीच्या नसून ‘इतकं’ आहे वय, जन्मतारीखच सांगितली; कोकणातलं गाव कुठलं अन् कुठे राहतात? जाणून घ्या

चाहत खन्नाची दोन लग्नं अन् घटस्फोट

चाहत खन्ना याआधीही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. तिचं दोनदा लग्न झाले असून दोन्ही वेळा तिचा घटस्फोट झाला. तिने २००६ मध्ये भरत नरसिंघानीशी लग्न केलं होतं. त्यावेळी ती फक्त २० वर्षांची होती. मात्र, त्यांचं नातं फार काळ टिकले नाही आणि वर्षभराने २००७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

“एक गोष्ट मी अजूनही…”, तीन वर्षांनंतर मंदिरा बेदीने पतीच्या निधनाबद्दल सोडलं मौन; हार्ट अटॅकने झाला राज कौशलचा मृत्यू

पहिल्या लग्नात अपयश आल्यानंतर चाहत खन्नाने सहा वर्षांनी २०१३ मध्ये फरहान मिर्झाशीत लग्न केलं. पण, चाहतचे हे लग्नही फार काळ टिकले नाही. या नात्यात अभिनेत्रीला खूप त्रास सहन करावा लागला. पाच वर्षांनी २०१८ मध्ये तिने घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर तिने पतीच्या गैरकृत्यांबद्दल सांगितलं होतं. फरहान तिचं शारीरिक आणि मानसिक शोषण करायचं असं त्याने म्हटलं होतं. चाहतचे तिच्या सहकलाकाराशी प्रेमसंबंध असल्याचा त्याला संशय होता. फरहानला सोडण्याचा निर्णय योग्य होता, असं चाहतने म्हटलं होतं.

रियासी दहशतवादी हल्ल्यातून थोडक्यात बचावला अभिनेता; संताप व्यक्त करत म्हणाला, “ते सगळं खूप भयावह…”

जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवायचा फरहान

इतकंच नाही तर फरहान जबरदस्तीने संबंध ठेवत होता, असं चाहतने सांगितलं होतं. तिला बरं नसलं, आजारी असली तरी फरहान शारीरिक सबंध ठेवायचा, असं चाहतने म्हटलं होतं. आपला जीव गेला तरी फरहानला काही फरक पडायचा नाही, असं चाहत म्हणाली होती. आपल्या मुलींसाठी हे सर्व सहन करावं लागत होतं, असल्याचे चाहतने सांगितलं होतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress chahat khanna live in relationship with rohan gandotra after two divorce hrc