छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री छवी मित्तल ही कायमच काही ना काही कारणांमुळे चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ती सिनेसृष्टीपासून दूर आहे. तिने विविध मालिकेतून अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मागच्या काही काळापासून छवी मित्तल ही स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देत आहे. अलिकडेच तिनं यावर शस्त्रक्रिया करून घेतली. त्यानंतर आता छवीचे काही फोटो व्हायरल होत आहे. यात तिचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळत आहे.

छवी मित्तल आणि तिचे कुटुंब सध्या बँकॉक आणि फुकेटमध्ये सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे. याचा अनेक फोटो आणि व्हिडीओही तिने पोस्ट केले आहेत. यातील अनेक व्हिडीओत छवी ही तिच्या फुकेटच्या ट्रीपची झलक दाखवताना दिसत आहे. त्याबरोबरच ती बिकीनी परिधान करत समुद्राचा आनंद घेतानाही दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी छवीने स्कूबा डाईव्ह करतानाचे व्हिडीओही पोस्ट केले आहेत.
आणखी वाचा : “जेव्हा मी माझ्या मुलांना दूध पाजले तेव्हा…”, स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार
a jam-packed four-wheeler was spotted ferrying a crowd of people
VIDEO : चारचाकीला रेल्वेचा डब्बा समजलात का? प्रवासी मोजता मोजता थकाल, व्हिडीओ होतोय व्हायरल
Marathi actress Aishwarya Narkar Dance With Ashwini Kasar on Ranbir Kapoor song
Video: ऐश्वर्या नारकर यांनी अश्विनी कासारबरोबर केला सुंदर डान्स, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: पारूचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पद आदित्य वाचवू शकणार का? मालिकेत पुढे काय घडणार? पाहा प्रोमो
Bigg Boss Marathi Fame sonali patil dance on mala lagali kunachi uchaki song
Video: “मला लागली कुणाची उचकी…”, हातात काठी घेऊन ऊसाच्या फडात ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्रीचा डान्स, पाहा व्हिडीओ
Bigg Boss Marathi season 5 Jahnavi Killekar entry in aboli star pravah serial
Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम जान्हवी किल्लेकर लवकरच नव्या दमदार भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार, ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत झळकणार

“जेव्हा तुमची सुट्टी आधीच्या सुट्टीपेक्षा चांगली असते, याचा अर्थ तुम्ही चांगले आयुष्य जगत आहात. कोणतीही तक्रार नाही, आता जिममध्ये जाण्याचे आणखी एक लक्ष्य आहे. मी बँकॉकला आली आहे. तुम्ही सुट्टीच्या काळात कुठे सुट्टी घालवता?” असा प्रश्न तिने तिच्या चाहत्यांना विचारला आहे. त्याबरोबरच छवीने चाहत्यांसाठी ब्यूटी टिप्सही शेअर केली आहे. “मी गेल्या ३० वर्षांत सनस्क्रीन वापरलेले नाही. फक्त खोबरेल तेल!” असे तिने यात म्हटले आहे.

आणखी वाचा : “तुम्ही त्याच मार्गाने…” तेजश्री प्रधानची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान छवी मित्तलने आतापर्यंत ‘कृष्णदासी’, ‘तीन बहुराणी’, ‘घरची लक्ष्मी कन्या’ यांसह अनेक मालिका केल्या आहेत. तिचे पती मोहित हुसैन यांची स्वतःची डिजीटल प्रॉडक्शन कंपनी आहे. त्यांना दोन मुले आहेत, एकाचे नाव अरहम आणि दुसरे अरिझा असे आहे.

Story img Loader