अभिनेत्री मीरा जोशी हिने मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनय आणि डान्सने वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मालिका, चित्रपट आणि रिअ‍ॅलिटी शोमधून ती घराघरात पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून मीरा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली होती. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर बॉयफ्रेंडबरोबरचा फोटो शेअर करून चाहत्यांचा आश्चर्याचा धक्का दिला होता. यामुळे ती लवकरच लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा रंगली होती. पण हे सगळं खोटं ठरलं. एका गाण्याच्या प्रमोशनचा हा भाग होता. अशातच आता मीरा ‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिकेत झळकणार असल्याचं समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम लाडक्या दादूसने ‘या’ फोटो मागची सांगितली गोष्ट; म्हणाला, “हा फोन….”

मीरा जोशीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना ही गूड न्यूज दिली आहे. या व्हिडीओत मीरा ‘चंद्रा’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. तसेच तिच्याबरोबर अभिनेते शरद पोंक्षे देखील पाहायला मिळत आहे. याचा अर्थ मीरा आता ‘झी मराठी’वरील ‘दार उघड बये’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – “अबाया परिधान केल्याने कोणी मुस्लिम होत नाही…” गौहर खानने नाव न घेता राखी सावंतवर केली टीका, म्हणाली…

हा व्हिडीओ शेअर करत मीराने लिहीलं आहे की, “मी ‘चंपा’ येतेय तुमचं मनोरंजन करायला उद्यापासून रोज रात्री ८.३० वाजता. मालिका ‘दार उघड बये’मध्ये… अर्थात आपल्या लाडक्या ‘झी मराठी’ वाहिनीवर.”

हेही वाचा – ‘वाळवी’नंतर पुन्हा एकदा स्वप्नील जोशी आणि शिवानी सुर्वे झळकणार ‘या’ चित्रपटात; अभिनेत्रीने शेअर केली पहिली झलक

मीराची ही पोस्ट पाहून सध्या तिच्यावर अभिनंदनाचा वर्षावर होत आहे. दरम्यान मीराच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिनं ‘लाल बत्ती’, ‘युथ’, ‘शिवा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. तसेच ती ‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘तुझं माझं ब्रेकअप’मध्ये झळकली होती. शिवाय तिनं डबिंग क्षेत्रातही काम केलं आहे. ‘पानिपत’ चित्रपटातील क्रिती सेनॉनचा मराठीतला आवाज मीराने दिला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress dancer meera joshi will enter in daar ughad baye marathi serial pps