लोकप्रिय अभिनेत्री डेलनाज इराणीचा (Delnaaz Irani) आज वाढदिवस आहे. ५२ वर्षांची डेलनाज इराणी बऱ्याच वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे. तिने आजपर्यंत अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केलं आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या डेलनाजचे वैयक्तिक आयुष्य चढ-उतारांनी भरलेले राहिले. घटस्फोटानंतर ती तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान व्यक्तीच्या प्रेमात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डेलनाज इराणी अभिनय क्षेत्रात जवळपास तीन दशकांपासून सक्रिय आहे. तिने सर्वात आधी बाबा सहगल यांच्या म्युझिक व्हिडीओत काम केलं होतं. यानंतर तिला लोकप्रियता मिळाली आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करायची संधी मिळाली. तिने ‘अकबर बिरबल’, ‘एक दीवाना था’, ‘शरारत’, ‘क्या मस्त लाइफ है’ आणि ‘छोटी सरदारनी’ या मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या.

नव्या नवेली नंदाने घेतला IIM Ahmedabad मध्ये प्रवेश, तिच्या कोर्सची फी किती? जाणून घ्या

डेलनाज इराणीचे चित्रपट

मालिकांव्यतिरिक्त डेलनाझने रिॲलिटी शोमध्येही भाग घेतला आहे. ती ‘बिग बॉस’, ‘नच बलिये’ आणि ‘झलक दिखला जा’मध्येही दिसली आहे. तिने शाहरुख खानच्या ‘कल हो ना हो’मध्ये काम केलं होतं. तसेच ‘हमको दीवाना कर गये’, ‘भूतनाथ’, ‘दिल ने जिस अपना कहा’, ‘रा.वन’, ‘पेइंग गेस्ट’ आणि ‘क्या सुपर कूल हैं’ या चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे.

वडिलांचे प्रसिद्ध अभिनेत्रीशी होते अफेअर, आईला कळालं अन् ती…; खुद्द ऋषी कपूर यांनी केलेला खुलासा

डेलनाज इराणी तिच्या अभिनयासह वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली. डेलनाजने १९९८ मध्ये अभिनेता राजीव पॉलशी लग्न केलं होतं पण १४ वर्षांनी २०१२मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर राजीवने दुसरं लग्न केलं. राजीवपासून घटस्फोट घेतल्यानंतर डेलनाज इराणी पर्सीला डेट करत आहे. पर्सी डेलनाजपेक्षा १० वर्षांनी लहान आहे. २०२२ मध्ये सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत डेलनाजने पर्सीचं कौतुक केलं होतं.

डेलनाज इराणी आणि तिचा बॉयफ्रेंड पर्सी (फोटो – इन्स्टाग्राम)

“माझ्या आयुष्याचे सगळे निर्णय दुसरे घेत होते आणि मला…”, अभिजीत सावंतने बोलून दाखवली खंत

“मला योग्य वेळी तो भेटला, त्याने मला सर्व समस्यांमधून बाहेर काढलं आणि मला नवीन आयुष्य दिलं,” असं डेलनाज म्हणाली होती. “मागील बऱ्याच वर्षांपासून आम्ही एकमेकांना डेट करत आहोत. मी त्याला खरंच एंजल मानते. कारण तो माझ्या आयुष्यात आला आणि त्याने मला भावनिक आणि मानसिक आधार दिला”, असं डेलनाज म्हणाली होती. आता डेलनाज आणि पर्सी यांच्या नात्याला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress delnaaz irani boyfriend percy age gap romantic photos hrc