छोट्या पडद्यावरील ‘गोपी बहू’ म्हणजेच अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी विवाहबंधनात अडकली आहे. देवोलीनाचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच सगळ्यांनाच सुखद धक्का बसला. देवोलीनाने तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. पण तिचा पती कोण आहे? हे मात्र तिने गुपित ठेवलं आहे. देवोलीनाने पतीचं नाव का सांगितलं नाही? हे आता समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Video : “तुझ्यात दम आहे तर…” राखी सावंत व अपूर्वा नेमळेकरमध्ये मारामारी, घरातील भांडी फोडतानाचाही व्हिडीओ व्हायरल

‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवोलीनाने तिच्या लग्नाबाबत भाष्य केलं. देवोलीनाचे नववधूच्या लूकमधील फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. याचबाबत तिला विचारलं असता देवोलीना म्हणाली, “माझा पती कोण आहे हे सध्या गुपितच राहू द्या. वेळ आल्यावर मी सगळं काही सांगेन.”

“कधीतरी माझा पती कोण आहे? हे सगळ्यांसमोर येईल. पण सध्या याबाबत गुप्तता असुद्या.” असं म्हणत देवोलीनाने तिचा नवरा कोण आहे? हे सांगण्यास नकार दिला आहे. मध्यंतरी देवोलीना तिचा सहकलाकार विशाल सिंहला डेट करत असल्याच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या.

आणखी वाचा – Video : अंगावर पीठ ओतलं, ढकलून दिलं अन्…; राखी सावंतचा ‘बिग बॉस’च्या घरात धिंगाणा, “अत्यंत बेकार बाई आहेस” म्हणत अपूर्वा भडकली

देवोलीना व विशालने आमच्यामध्ये फक्त मैत्री असल्याचं स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं होतं. इतकंच नव्हे तर देवोलीनाच्या लग्नाच्या फोटोंमध्ये विशालही दिसत आहे. देवोलीनावर सध्या चाहत्यांकडून तसेच कलाकारमंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण देवोलीनाच्या पतीचं नाव जाणून घेण्यास तिचे चाहतेही अधिक उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress devoleena bhattacharjee tie knot with mestry man her wedding photos goes viral on social media kmd