टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्या, सना सय्यद, अदिती शर्मा यांच्यानंतर आता ‘साथ निभाना साथिया’ फेम अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी आई झाली आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करून बाळाच्या आगमनाची बातमी दिली आहे. देवोलीनाने लग्नानंतर दोन वर्षांनी पती शानवाजबरोबर पहिल्या बाळाचं स्वागत केलं. तिच्या बाळाचा जन्म बुधवारी (१८ डिसेंबरला) झाला.
देवोलीना भट्टाचार्जीने मुलाला जन्म दिला आहे. तिने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना ही गुड न्यूज दिली. देवोलीना व शानवाज यांच्या घरी बुधवारी (१८ डिसेंबरला) चिमुकल्या सदस्याचं आगमन झालं आहे. देवोलीनाच्या या पोस्टवर तिचे मित्र-मैत्रिणी व चाहते कमेंट्स करून तिचं अभिनंदन करत आहेत.
हेही वाचा – Year Ender 2024: बजेट कमी असूनही गाजवले बॉक्स ऑफिस, यंदा प्रदर्शित झालेले ‘हे’ चित्रपट तुम्ही पाहिलेत का?
पाहा पोस्ट –
देवोलीना भट्टाचार्जीने जिम ट्रेनर शानवाज शेखला काही वर्षे डेट केलं होतं, त्यानंतर हे दोघेही १४ डिसेंबर २०२२ रोजी लग्नबंधनात अडकले. दोघांनी नोंदणी पद्धतीने लग्न केलं होतं. अगदी साधेपणाने त्यांचं लग्न पार पडलं होतं. या लग्नात दोघांचे कुटुंबीय व काही जवळचे लोक उपस्थित होते. आता लग्नानंतर दोन वर्षांनी देवोलीना व शानवाज आई-बाबा झाले आहेत.
देवोलीनाने २०११ मध्ये ‘सवांरे सबके सपने प्रीतो’ या शोमधून अभिनयाला सुरुवात केली होती. नंतर तिने ‘साथ निभाना साथिया’ मध्ये गोपी ही भूमिका केली होती. या मालिकेतून तिला खूप लोकप्रियता मिळाली. देवोलीना ‘बिग बॉस’चा भाग राहिली होती. देवोलीना ही एक प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना आहे. देवोलीनाने ‘लाल इश्क’, ‘साथ निभाना साथिया २’ आणि ‘दिल दियां गल्लां’, ‘छठी मैय्या की बिटिया’ या शोमध्ये काम केलं आहे.