टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्या, सना सय्यद, अदिती शर्मा यांच्यानंतर आता ‘साथ निभाना साथिया’ फेम अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी आई झाली आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करून बाळाच्या आगमनाची बातमी दिली आहे. देवोलीनाने लग्नानंतर दोन वर्षांनी पती शानवाजबरोबर पहिल्या बाळाचं स्वागत केलं. तिच्या बाळाचा जन्म बुधवारी (१८ डिसेंबरला) झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवोलीना भट्टाचार्जीने मुलाला जन्म दिला आहे. तिने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना ही गुड न्यूज दिली. देवोलीना व शानवाज यांच्या घरी बुधवारी (१८ डिसेंबरला) चिमुकल्या सदस्याचं आगमन झालं आहे. देवोलीनाच्या या पोस्टवर तिचे मित्र-मैत्रिणी व चाहते कमेंट्स करून तिचं अभिनंदन करत आहेत.

हेही वाचा – Year Ender 2024: बजेट कमी असूनही गाजवले बॉक्स ऑफिस, यंदा प्रदर्शित झालेले ‘हे’ चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

पाहा पोस्ट –

हेही वाचा – “करिअरमधील सर्वात लहान प्रकरण”, समीर वानखेडेंचे आर्यन खानबद्दल वक्तव्य; शाहरुखच्या डायलॉगबद्दल म्हणाले, “थर्ड क्लास…”

देवोलीना भट्टाचार्जीने जिम ट्रेनर शानवाज शेखला काही वर्षे डेट केलं होतं, त्यानंतर हे दोघेही १४ डिसेंबर २०२२ रोजी लग्नबंधनात अडकले. दोघांनी नोंदणी पद्धतीने लग्न केलं होतं. अगदी साधेपणाने त्यांचं लग्न पार पडलं होतं. या लग्नात दोघांचे कुटुंबीय व काही जवळचे लोक उपस्थित होते. आता लग्नानंतर दोन वर्षांनी देवोलीना व शानवाज आई-बाबा झाले आहेत.

हेही वाचा – नेटफ्लिक्सवर या आठवड्यात सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या सिनेमांची यादी; १० पैकी ७ भारतीय चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

देवोलीनाने २०११ मध्ये ‘सवांरे सबके सपने प्रीतो’ या शोमधून अभिनयाला सुरुवात केली होती. नंतर तिने ‘साथ निभाना साथिया’ मध्ये गोपी ही भूमिका केली होती. या मालिकेतून तिला खूप लोकप्रियता मिळाली. देवोलीना ‘बिग बॉस’चा भाग राहिली होती. देवोलीना ही एक प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना आहे. देवोलीनाने ‘लाल इश्क’, ‘साथ निभाना साथिया २’ आणि ‘दिल दियां गल्लां’, ‘छठी मैय्या की बिटिया’ या शोमध्ये काम केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress devoleena bhattacharjee welcomes baby boy with husband shanawaz shaikh hrc