टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी व तिचा पती विवेक दहिया इटलीमध्ये फिरायला गेले होते, पण बुधवारी फ्लॉरेन्समध्ये त्यांचे सामान व पैसे चोरी झाले. चोरट्यांनी गाडीच्या खिडक्या फोडून त्या दोघांचे पासपोर्टही नेले. आता विवेक व दिव्यांका तिथेच अडकून पडले आहेत. या प्रकरणी दिव्यांकाने इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याकडे मदत मागितली आहे.

नेमकं काय घडलं?

बुधवारी फ्लॉरेन्स याठिकाणी फिरायला गेले होते. त्यांनी मुक्कामी थांबण्यासाठी जे ठिकाण निवडलं होतं ते पाहायला दोघेही गेले होते आणि सर्व सामान बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये तसेच ठेवले होते. पण ते सामान घेण्यासाठी परत आले तेव्हा कारमध्ये फक्त जुने कपडे व काही खाण्यापिण्याच्या वस्तू होत्या. चोरट्यांनी कारची काच फोडून त्यांचे पासपोर्ट, पर्स, पैसे, खरेदी केलेल्या वस्तू आणि जवळच्या मौल्यवान वस्तू असे १० लाख रुपयांचे सामान चोरून नेले.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Navri Mile Hitlarla
“तुला माझ्यासाठी…”, सुनांच्या हट्टासाठी एजेने दिली शिक्षा; लीलाचा आनंद मात्र गगनात मावेना, पाहा प्रोमो
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर

पासपोर्ट, पैसे अन् १० लाखांचे सामान लुटले; अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीला विदेश ट्रिपवर आला वाईट अनुभव

इटलीमध्ये अडकले विवेक-दिव्यांका

या घटनेनंतर दिव्यांका व विवेक सध्या इटलीमध्ये अडकले आहेत, कारण भारतात परतायला त्यांच्याकडे पासपोर्ट नाहीत. तिने सोशल मीडियावरून मेलोनी यांना मदत मागितली आहे. दिव्यांकाने इन्स्टाग्रामवर तिला आलेला वाईट अनुभव शेअर केला. फिरत असताना त्यांचे पासपोर्ट, पैसे आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग चोरीला गेल्याचं तिने सांगितलं. सगळं सामान चोरी गेल्याने आता काय करावं असा प्रश्न तिला व विवेकला पडला आहे.

फक्त तीन कलाकार, १५ दिवसांत शूटिंग अन्…, ‘या’ भयपटाने केलेली बक्कळ कमाई, कुठे पाहता येणार सिनेमा? जाणून घ्या

दिव्यांकाने जॉर्जिया मेलोनींकडे मागितली मदत

दिव्यांकाने एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात तिने तिचा अनुभव सांगितला व जॉर्जिया मेलोनी यांच्याकडे मदत मागितली. “प्रिय पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आम्ही इटलीमध्ये छान फिरत होतो, पण अशातच आमचं सामान चोरीला गेलं. आम्ही पोलिसांना कळवलं आहे. पण इथे भरदिवसा ज्या पद्धतीने दरोडे टाकले जात आहेत ते पाहून आमचा उत्साह व आशा दोन्ही संपलंय. यानंतर पुन्हा इटलीला येण्याचं आमचं धाडस तरी होईल का?” असा प्रश्न तिने पोस्ट करून विचारला.

दिव्यांका त्रिपाठीने तिच्या पोस्टमध्ये इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याबरोबर भारतातील इटलीच्या दूतावासाला टॅग करून मदत करण्याची विनंती केली. तसेच तिने चाहत्यांनाही या परिस्थितीत उपयोगी येतील असेल संपर्क शेअर करण्यास सांगितलं. अनेक जण तिच्या या पोस्टवर कमेंट करून तिला मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, दिव्यांकाबरोबर घडलेल्या या घटनेनंतर इटलीला फिरायला जाणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Story img Loader