Drashti Dhami Reveals Baby Girl Name: लोकप्रिय टीव्ही मालिका ‘मधुबाला’ मालिकेत मुख्य भूमिका करून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री दृष्टी धामी नुकतीच आई झाली. लग्नानंतर नऊ वर्षांनी दृष्टीला कन्यारत्न झाले. २२ ऑक्टोबर रोजी जन्मलेली तिची गोंडस लेक आता एका महिन्याची झाली आहे. आता तिने तिच्या मुलीचं नाव जाहीर केलं आहे.

दृष्टी धामी व तिचा पती नीरज खेमका हे लग्नानंतर नऊ वर्षांनी आई-बाबा झाले. त्यांनी ऑक्टोबरमध्ये आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं. मुलगी एक महिन्याची झाल्यावर त्यांनी एक सुंदर फोटो शेअर करून तिचं नाव काय ठेवलंय, ते सांगितलं.

हेही वाचा – दीड वर्षापूर्वी बिझनेसमनशी लग्न करणारी बॉलीवूड अभिनेत्री झाली आई, मुलीला दिला जन्म

दृष्टी व नीरज यांनी आपल्या लेकीची चिमुकली पावलं हातात घेऊन एक फोटो काढला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी मुलीचं नाव जाहीर केलं. दृष्टी व नीरजने मुलीचं नाव ‘लीला’ ठवलं आहे. ‘Say hello to Leela | लीला’ असं कॅप्शन देऊन त्यांनी हा फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा – लोकप्रिय सेलिब्रिटी जोडप्याने दिली गुड न्यूज; लग्नाच्या १० वर्षानंतर केलं दुसऱ्या बाळाचं स्वागत

दृष्टीच्या या व्हिडीओवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. नकुल मेहता, सुनयना फौजदार, अनुषा दांडेकर यांनी या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत.

Drashti Dhami Reveals Baby Girl Name
दृष्टी धामी, तिचा पती नीरज व त्यांची लाडकी लेक लीला (फोटो – इन्स्टाग्राम)

दरम्यान, दृष्टी धामी ही टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘मधुबाला’ या शोद्वारे तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. इतर अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. दृष्टी मागील काही काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे, मात्र ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

हेही वाचा – माधुरी दीक्षितवर जडला जीव, मॅच फिक्सिंगमध्ये अडकला अन् तिने…; भारताच्या सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूची अधुरी प्रेमकहाणी

दृष्टी व नीरज यांनी सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१५ मध्ये लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला अनेक टीव्ही सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आता लग्नाच्या नऊ वर्षांनी हे दोघे एका गोंडस लेकीचे आई-बाबा झाले असून त्यांच्या लेकीचं नाव लीला असं आहे.

Story img Loader