Drashti Dhami First Photo with Newborn Daughter: ‘मधुबाला’ मालिकेत मुख्य भूमिका साकारून लोकप्रिय झालेली टीव्ही अभिनेत्री दृष्टी धामी आई झाली आहे. ती लग्नानंतर नऊ वर्षांनी आई झाली. २२ ऑक्टोबर रोजी तिने मुलीला जन्म दिला. आता तिच्या गोंडस लेकीचा पहिला फोटो तिने शेअर केला आहे. तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दृष्टी धामी ही टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘मधुबाला’ या शोद्वारे तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. इतर अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. दृष्टी मागील काही काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे, मात्र ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. आता दृष्टी आई झाली असून तिने तिची लाडकी लेक पती नीरज खेमकाबरोबरचा फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा – घटस्फोटित अभिनेत्रीने ११ वर्षांनी मोठ्या आध्यात्मिक गुरूशी केलं दुसरं लग्न, फोटो झाले व्हायरल

फोटोमध्ये दृष्टीने निळ्या रंगाचा कुर्ता घातला आहे. तर नीरजने पिवळ्या रंगाचा साधा कुर्ता घातला आहे. दृष्टीने तिच्या लेकीला जवळ घेतलंय. यात तिच्या लेकीचा चेहरा दिसत नाही. ‘आता सर्व पार्ट्यांना थोडा उशीर होणार आहे!’ असं कॅप्शन देत तिने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष

पाहा फोटो –

दृष्टीने शेअर केलेल्या या फोटोवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत. जेनिफर विंगेट, नकुल मेहता, पूजा बॅनर्जी, करण ग्रोव्हर, पूजा गौर, सुनयना यांनी दृष्टीला कमेंट्स करून शुभेच्छा दिल्या आहेत. दृष्टीच्या पोस्टवर चाहत्यांनीही लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा – दोन प्रेमविवाह, दोन्ही वेळा घटस्फोट; आता अभिनेत्रीने खरेदी केलं आलिशान घर, दिवाळीनिमित्त दाखवली घराची झलक

दृष्टी व नीरज यांनी सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केलं होतं. नंतर त्यांनी २०१५ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला अनेक टीव्ही सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आता लग्नाच्या नऊ वर्षांनी हे दोघे आई-बाबा झाले आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress drashti dhami shares first photo with newborn daughter hrc