बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. तिचा आणि आदिल खानचा वाद संपण्याच नाव घेत नाहीये. अशातच राखीनं उमराह करण्यासाठी मक्का-मदीना गाठलं. त्यानंतर भारतात परतली तेव्हा तिनं पापराझींना ‘राखी’ नाही तर ‘फातिमा’ नावानं हाक मारण्यासाठी सांगितलं होतं. शिवाय ती तेव्हापासून अबाया परिधान करून फिरताना दिसत आहे. यासंबंधीचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यादरम्यान अभिनेत्री गौहर खानची एक पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमधून तिनं धर्माची खिल्ली उडवणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. गौहर नेमकी काय म्हणाली जाणून घ्या…
गौहर खानने राखीचं नाव न घेताचा तिच्यावर निशाणा साधला आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर गौहरने कतरमधील एका संस्थेने २० अनाथ मुलांना उमराहसाठी कसे पाठवले? ही पोस्ट शेअर करत लिहीलं आहे की, “काही लोकं इस्लामची खिल्ली उडवत आहेत. भयानक दिसणारी व्यक्ती अबाया परिधान करून मुस्लिम होत नाही. अशाप्रकारे ड्रामा करणारे लोक तिथे कसे पोहोचत आहेत? त्यानंतर तिथे जाऊन सुद्धा ड्रामा करत आहेत. एका मिनिटात इस्लाम स्वीकारून दुसऱ्या मिनिटाला म्हटलं जातं की, हे मी स्वतःच्या इच्छेने केलं नाही. हा सर्व मूर्खपणा आहे.”
तसेच पुढे गौहरने लिहीलं आहे की, “जेव्हा प्रसिद्धीची गरज असते तेव्हा इस्लामचा स्वीकार केला जातो. लाज वाटली पाहिजे. यावर सौदी आणि भारताच्या बोर्ड ऑफ इस्लामने कठोर पाऊल उचललं पाहिजे. ज्यामुळे पुन्हा कोणी अशाप्रकारे धर्माची खिल्ली उडवणार नाही. कोणतीही आस्था किंवा श्रद्धा मनात असते, ती दाखवण्यासाठी ५९ कॅमेरांची गरज भासत नाही.”