अभिनेत्री गौतमी देशपांडे ही मराठी मनोरंजन सृष्टीतील एक ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘सारे तुझ्याकसाठी’ मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. तर नंतर ‘माझा होशील ना’ या मालिकेने तिला वेगळी ओळख दिली. आज तिचा चाहतावर्गही मोठा आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. आता तिची एक इंस्टाग्राम स्टोरी चर्चेत आली आहे.

गौतमी देशपांडे नेहमीच सोशल मीडियावर तिच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी, तिचे आणि मृण्मयीचे गमतीशीर व्हिडीओ, तिचे विचार शेअर करत असते. आता काल महिला दिनानिमित्त तिने महिलांना मिळणारा पगार आणि पर डे यावर भाष्य केलं.

Dr. Manmohan Singh passes away at 92
Dr. Manmohan Singh Passes Away : देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, आजचे शासकीय कार्यक्रम रद्द; मनमोहन सिंग यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार!
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Dr. Manmohan Singh passes away at 92
Manmohan Sing Death : मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, “माझे आदर्श आणि मार्गदर्शक..”
ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
pune video
“चला गोल फिरा..” ही पुणेरी पाटी कशासाठी? Video होतोय व्हायरल
Vinod Kambli Message to Sachin Tendulkar
Vinod Kambli : विनोद कांबळीचं वक्तव्य, “मी मरणार नाही, सचिनला निरोप द्या, मी लवकरच…”
Mantralaya Cabins
Ministers Cabin : नवनिर्वाचित मंत्र्यांना मंत्रालयातल्या दालनांचं वाटप, चंद्रशेखर बावनकुळे ते योगेश कदम कोण कुठे बसणार? जाणून घ्या एका क्लिकवर
Seema haider pregnant husband Sachin reacted after she gave pregnancy news video viral on social media
पाकिस्तानातून पळून आलेली सीमा हैदर आता पाचव्यांदा होणार आई, सोशल मीडियावर VIDEO शेअर करत दिली गुड न्यूज, पण सचिन म्हणाला…

आणखी वाचा : Video: “मला त्रास देणं बंद कर…” वैतागलेल्या गौतमीला बहिणीचं भन्नाट उत्तर, म्हणाली…

काल महिला दिनानिमित्त गौतमीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट केली आणि महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तिने लिहिलं, “महिला दिनाच्या शुभेच्छा! मुलींना पण मुलांसारखी त्या डिझर्व करत असलेली सॅलरी आणि पर डे मिळू देत…बाकी काही त्रास नाहीत आयुष्यात.”

हेही वाचा : अभिनेत्री गौतमी देशपांडेचं ग्लॅमरस फोटोशूट, फोटोंना चाहत्यांची पसंती

आता तिची ही पोस्ट खूप चर्चेत आली आहे. दरम्यान, ‘माझा होशील ना’नंतर गौतमी कोणत्याही मालिकेत झळकली नाही. तर सध्या ती अनेक लाईव्ह कार्यक्रमांमध्ये सहभाग घेताना दिसते. त्यामुळे आता ती छोट्या पडद्यावरून कधी भेटायला येणार याची तिचे चाहते वाट बघत आहेत.

Story img Loader