अभिनेत्री गौतमी देशपांडे ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. गौतमीने तिची मोठी बहीण अभिनेत्री मृण्मयी देशपांडेच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आणि स्वतःच्या टॅलेंटने वेगळं स्थान निर्माण केलं. तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. तर आता तिने तिच्या लव्ह लाईफबद्दल मोठा खुलासा केला आहे.

गौतमीने आतापर्यंत वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. तिच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. तर गौतमीही सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असते. आता नुकताच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून ‘आस्क मी एनिथिंग’ सेशनद्वारे तिच्या चाहत्यांशी संवाद साधला.

Marathi actress tejashri Pradhan talk about her future life partner
अभिनेत्री तेजश्री प्रधानला ‘असा’ हवाय जोडीदार, म्हणाली, “फक्त नात्यात…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Bigg Boss Marathi Season 5 Fame Yogita Chavan Dance video viral
Video: “बाई हा काय प्रकार”, ‘बिग बॉस मराठी’ फेम योगिता चव्हाणचा डान्स पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…
marathi actress pratima deshpande baby name
वर्षभरापूर्वी लग्नगाठ बांधणारी मराठी अभिनेत्री झाली आई, लेकीचं नाव ठेवलं ‘अहना’; नामकरण सोहळ्याचा व्हिडीओ चर्चेत
Navri Mile Hitlarla
Video: ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम वल्लरी विराजने शेअर केला शूटिंगचा व्हिडीओ; म्हणाली…
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…

आणखी वाचा : मिम शेअर करत गौतमी देशपांडे बहिणीला दिली गाढवाची उपमा, नंतर मृण्मयीने असं काही उत्तर दिलं की…

या सेशनमध्ये तिच्या चाहत्यांनी तिला तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारले. गौतमीनेही त्या प्रश्नांना अगदी दिलखुलासपणे उत्तरे दिली. यावेळी एका चाहत्याने तिला विचारलं की, “तुझा बॉयफ्रेंड आहे का?” त्यावर गौतमीने उत्तर दिलं. त्यांच्या पाळीव श्वानाचा फोटो शेअर करत तिने लिहिलं, “हो…भेटा त्याला.” आता गौतमीने दिलेल्या या उत्तराकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे. त्यावरून गौतमी सध्या सिंगल असावी असा अंदाज तिचे चाहते बांधू लागले आहेत.

हेही वाचा : ‘चेन्नई सुपर किंग्स’ने IPL जिंकल्याचा आनंद व्यक्त करत गौतमी देशपांडेने ‘मुंबई इंडियन्स’च्या चाहत्यांना केलं लक्ष्य, म्हणाली…

दरम्यान, गौतमी सध्या कोणत्याही मालिकेमध्ये किंवा चित्रपटांमध्ये दिसत नाहीये. त्यामुळे आगामी काळात ती कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Story img Loader