अभिनेत्री सुप्रिया पाठारे या मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. सोशल मीडियावर सक्रिय राहून त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी त्याच्याहत्यांशी शेअर करत असतात. नुकतच त्यांच्या मुलाने ठाण्यामध्ये स्वतःचं नवीन हॉटेल सुरू केलं आहे. नुकतंच या हॉटेलचं उद्घाटन झालं. तर या निमित्ताने अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी या हॉटेलमधील पदार्थ त्यांना कसे वाटले हे सांगितलं आहे.

सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहिर पाठारे प्रोफेशनने शेफ आहे. परदेशात लोकप्रिय असलेली फूट ट्रकची संकल्पना त्याने ठाण्यात सुरू केली. ‘मharaj’ असं त्या फूट ट्रकच नाव आहे. तर आता त्याने ‘मharaj’ पावभाजी आणि फास्ट फूट कॉर्नर सुरू केलं आहे. या त्याच्या नवीन हॉटेलचे उद्घाटन अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांच्या हस्ते करण्यात आलं.

आणखी वाचा : ‘असं’ आहे सुप्रिया पाठारे यांच्या लेकाने ठाण्यात सुरू केलेलं नवीन हॉटेल, पाहा खास झलक

हर्षदा खानविलकर यांनी या हॉटेलचे उद्घाटन तर केलंच पण याचबरोबर या हॉटेलमधील विविध पदार्थही खाल्ले. हे सगळे पदार्थ त्यांना खूप आवडले. इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत त्यांनी या हॉटेलमधील पदार्थांचे कौतुक केलं. त्यांनी त्यांचा सुप्रिया पाठारे आणि मिहिर पाठारे यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर करत लिहिलं, “या हॉटेलमधील सर्व पदार्थांची चव उत्तम आहे. ठाण्यातील टेस्टी व्हेज पदार्थ… खूप शुभेच्छा!”

हेही वाचा : ‘उंच माझा झोका’तील छोटी रमा आता दिसते ‘अशी’, तेजश्रीबरोबरचा फोटो पोस्ट करत मालिकेचे दिग्दर्शक म्हणाले…

सोशल मीडियावर आता मिहिरने सुरु केलेल्या या नवीन हॉटेलचे फोटो आणि व्हिडीओ खूप व्हायरल होत आहेत. त्यावर कमेंट करत आता सर्वजण मिहिर आणि सुप्रिया पाठारे यांना या नवीन हॉटेलसाठी शुभेच्छा देत आहेत.

Story img Loader