मराठी सिनेसृष्टीतील बिनधास्त आणि बेधडक अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असते. याचबरोबर समाजातील तिला खटकणाऱ्या गोष्टींवरही ती भाष्य करत असते. नुकतंच हेमांगी कवीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टची सगळीकडे चर्चा सुरु आहे.

हेही वाचा- Video : पहिल्या केळवणात अमृता देशमुख-प्रसाद जवादेने घेतले सुंदर उखाणे; ८७ वर्षांच्या आजोबांनी केलं लाडक्या नातीचं केळवण

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
katrina kaif vicky kaushal third marriage anniversary
लग्नाला तीन वर्षे पूर्ण! कतरिना कैफने पती विकी कौशलसाठी केली खास पोस्ट; म्हणाली, “दिल तू…”

नुकतचं हेमांगीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने तिची अनेक वर्षांपासूनची असलेली इच्छा पूर्ण झाल्याचे सांगितले आहे. या पोस्टमध्ये तिने मुंबईतील रॉयल ओपेरा हाऊसच्या बाहेर किल्क केलेला फोटो शेअर केला आहे.

हेमांगी कवीची पोस्ट

खरंतर भक्ताला कुठलंही देऊळ सारखंच! इतर अनेक ठिकाणी त्याने विठ्ठलाची मूर्ती पाहीलेली असली तरीही ‘आयुष्यात एकदा तरी पंढरपूरला जाऊन दर्शन घ्यावं’ ही इच्छा तो मनी बाळगतोच!
तसंच माझंही होतं. मला कुठल्याही नाट्यगृहात प्रयोग करायला आवडतंच पण ‘साला एकदा तरी या रॅायल ॲापेरा मध्ये प्रयोग करायचाय यार’ ही अनेक वर्षांपासूनची इच्छा होती!
आणि…
काल मुंबईच्या रॅायल ॲापेरा हाऊस मध्ये आमच्या ‘जन्मवारी’ नाटकाचा रॅायल प्रयोग झाल्यामुळे माझी ही पण इच्छा पूर्ण झाली!
खरंच नावाप्रमाणे सगळा रॅायल कारभार. नाट्यगृहाचं interior, lights, decorum, greenrooms, त्यातलं furniture, स्वच्छता, corridors, रंगसंगती, sound system, भव्य दिव्यपणा! आहाहा! क्या बात है. सगळंच विलक्षण! एखाद्या राजमहालात आलोय की काय असंच वाटत होतं! इतक्या वर्षांपासून फक्त इतरांकडून या वास्तूचं कौतुक ऐकत आलेय, कुणाकुणाच्या photos मध्ये पाहत आलेय पण काल मी चक्कं त्या वास्तूमध्ये उभं राहून प्रयोग सादर केला!
अनेक वेळा मी या नाट्यगृहाला बाहेरून बघितलंय पण कायमच ‘आतून हे कसं असेल’ याचं कुतूहल वाटत आलंय.
म्हणजे रीतसर तिकीट काढून प्रेक्षक म्हणून नाट्यगृह नक्कीच बघता आलं असतं पण आपन ठहरे कलाकार!!! “आत पाऊल ठेवेन ते माझ्या नाटकाचा प्रयोग करायलाच”!!! या खुळ्या निग्रहामुळे खूप वर्ष वाट पाहावी लागली खरंतर मला पण ते वाट पाहणं worth होतं असंच वाटलं! अनेक दिवस वारीत चालून झाल्यावर जेव्हा पंढरपूरात पाऊल पडतं तेव्हा जे त्या भक्ताचं होत असेल तेच माझं ही झालं! धन्य धन्य!
माझा हा निग्रह पुर्ण करण्याची आणि प्रयोग सादर करण्याची संधी मिळाली ते ‘नाट्यधारा’ नाट्यमहोत्सवामुळे.
संपूर्ण भारतातून काही नाटकांची निवड केली होती त्यात ‘जन्मवारी’ नाटक निवडल्याबद्दल नाट्यधारा निवडसमीतीचे आणि अनेक वर्षांपासून रंगभूमीची ज्या मनापासून जोपासना करताएत असे आमचे Ravi Mishra sir यांचे खूप खूप धन्यवाद!

दरम्यान हेमांगीने आतापर्यंत अनेक नाटक, मालिका, चित्रपट यासारख्या विविध क्षेत्रात काम केली आहेत. यात विविध भूमिका साकारत तिने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. हेमांगी काही दिवसांपूर्वी ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेत झळकली होती. त्याबरोबरच ‘पिपाणी’, ‘बंदीशाळा’, ‘डावपेच’ या चित्रपटांमधील हेमांगीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. ‘तमाशा Live’ या चित्रपटामध्ये देखील हेमांगीनं काम केलं होतं.

Story img Loader