मराठी मनोरंजन क्षेत्रातील बोल्ड अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. आपल्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभावामुळे हेमांगी नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हेमांगी आपली भूमिका स्पष्टपणे मांडताना दिसते. दरम्यान, हेमांगीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.
हेही वाचा- “मी देखील त्यातलीच एक…”, हेमांगी कवीने मागितली जाहीर माफी, कारण…
सोशल मीडियावर हेमांगी नेहमी सक्रिय असते. निरनिराळे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकताच हेमांगीने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये हेमांगीने हातात ‘कर्म’ असं लिहिलेली एक आंगठी घातली आहे. फोटो शेअर करत हेमांगीने त्याला एक भन्नाट कॅप्शनही दिली आहे. फोटो शेअर करत तिनं लिहिलं, आपल्याला जास्ती काय कळत नाय, पण येक कळतं… माणसाचं कर्म चांगलं असलं की नाय त्याला रात्रीची झोप लय भारी लागती अन् झोप समद्या… समद्या मंजी समद्या सुखांचं मुळ हाय! ज्याला चांगली झोप, तो लय मोट्टा तोप! जय हिंद, जय महाराष्ट्र.”
हेमांगीच्या या फोटोची आणि कॅप्शनची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक चाहत्यांनी या फोटोवर कमेंट केल्या आहेत. अनेकांनी तिच्या लूकचे कौतुक केलं आहे.
हेमांगीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर चित्रपट, मालिका नाटकांच्या माध्यमातून तिने आपला अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या ती ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेत काम करत आहे. या मालिकेत तिने अॅड. गायत्री वर्तक हे पात्र साकारलं आहे. तसेच लवकरच ती अमिताभ बच्चन यांच्याबरोबर एका जाहिरातीतही झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच हेमांगीने या जाहिरातीच्या शूटिंगदरम्यानचे पोस्टर शेअर केले होते.