अभिनेत्री ईशा केसकर छोट्या पडद्यावरील ‘जय मल्हार’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकांमुळे घराघरांत पोहोचली. त्यानंतर ‘सरला एक कोटी’ या चित्रपटात ईशाने महत्त्वाची भूमिका साकारली. अभिनेत्रीने अलीकडेच ‘संपूर्ण स्वराज’च्या पॉडकास्ट कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी ईशाने मराठी चित्रपटसृष्टीत महिला कलाकारांना मिळणाऱ्या मानधनावर भाष्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ‘द केरला स्टोरी’नंतर विपुल शाहांची ‘कमांडो’ सीरिज चर्चेत, लोकप्रिय मराठी अभिनेता दिसणार ‘या’ भूमिकेत, ट्रेलर प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीत पुरुष आणि महिला कलाकारांना वेगवेगळी वागणूक दिली जाते का? असा प्रश्न ईशाला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, “मराठी इंडस्ट्रीमध्ये पुरुष किंवा महिला असा भेदभाव केला जातो असे मी म्हणणार नाही. पण, पैशांच्या बाबतीत हा फरक कायम दिसून येतो. दोघांना मिळणारे मानधन हे सारखे नसते. हिरोला आणि हिरोईनला वेगवेगळे मानधन हा भेदभाव अजूनही आहे. फक्त मराठी इंडस्ट्रीच नव्हे तर सगळीकडे हेच आहे.”

हेही वाचा : ‘रॉकी और रानी…’ चित्रपटासाठी दिग्दर्शक संजय जाधव यांनी शेअर केली खास पोस्ट; म्हणाले, “करण जोहर सर…”

ईशा पुढे म्हणाली, “आज एक अभिनेत्री म्हणून जेव्हा मी इतर महिलांचे प्रतिनिधित्व करते. तेव्हा हा पैशांमुळे केला जाणारा फरक जाणवतो. अभिनेत्रींना छोटी पायरी दिल्यासारखी वाटते. यामुळे फक्त महिला कलाकारांच्या मानसिकतेवर परिणाम न होता संपूर्ण युनिटच्या मानसिकतेवर याचा परिणाम होतो. त्यांच्या मनातही अभिनेत्री आहेच… पण, पुरुष अभिनेता जास्त महत्त्वाचा आहे असा विचार येतो. मलाही कधीच समान मानधन दिले गेले नाही हे मी ठामपणे सांगेन.”

हेही वाचा : “तिसऱ्या पत्नीने ठेवलेला आईशी लग्नाचा प्रस्ताव पण…”, राहुल महाजनने सांगितलेला नताल्याबरोबरच्या पहिल्या भेटीचा किस्सा

दरम्यान, अभिनेत्री ईशा केसकरच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचे झाले तर, गेली ६ वर्ष ईशा ऋषी सक्सेनाबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर या दोघांचीही ओळख झाली होती. ऋषीने ‘काहे दिया परदेस’मध्ये शिवची भूमिका साकारली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress isha keskar expressed her clear opinion on equal payment to hero and heroine sva 00
Show comments