गेल्या काही वर्षांपासून कलाकृतींमध्ये दिसणारे बोल्ड सीन्स खूपच चर्चेत येऊ लागले आहेत. छोटा पडदा असो अथवा मोठा; कलाकार देखील बिनधास्तपणे बोल्ड सीन्स देताना दिसतात. पण अशातच काही कलाकार असे आहेत जे बोल्ड सीनसाठी स्पष्टपणे नकार देतात. यातलीच एक अभिनेत्री म्हणजे जन्नत जुबेर.
जन्नत जुबेर ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये तिने प्रमुख भूमिका साकारल्या. ‘तू आशिकी’मध्ये को-स्टार ऋत्विक अरोरासोबत तिचे किसिंग सीन होते. त्याला तिने नकार दिल्यावर त्याची बरीच चर्चा रंगली. तर आता बोल्ड सीन न देण्यामागचं कारण तिने नुकतंच स्पष्ट केलं आहे.
‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “माझ्या वडिलांनी मला स्क्रीनवर किसिंग सीन देण्यासाठी फक्त मनाई केली होती. मीच स्वतःसाठी एक मर्यादा आखली आहे. बोल्ड सीन्ससाठी मला माझी मर्यादा ओलांडायची नव्हती. जर एखादा सीन माझ्या कंफर्ट झोनमधला असेल तरच मी तो करेन.”
हेही वाचा : “…तर त्यांनी शो सोडावा,” ‘मास्टरशेफ इंडिया’वर प्रेक्षक नाराज, जाणून घ्या नेमकं काय घडलं
ओटीटी माध्यमांमध्ये बोल्ड सीन्स अधिक असल्यामुळे या माध्यमाकडे ती वळणार नाही असं तिने मध्यंतरी सांगितलं होतं. पण आता तिचा विचार बदलला आहे. इतर कलाकारांप्रमाणेच ती देखील ओटीटीवर काम करताना दिसणार आहे. जन्नत शेवटची टीव्हीवर ‘खतरों के खिलाडी १२’मध्ये दिसली होती. ‘कुल्चे छोले’ या पंजाबी चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावरही पदार्पण केलं आहे.