‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ फेम जया भट्टाचार्य ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. सध्या तिच्या मालिकेमुळे नाहीतर वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. तिने श्वानाच्या एका दीड महिन्याच्या पिल्लाचा जीव वाचवला आहे. तिने नायगाव भागातून एका पिल्लाची सुटका केली आहे. या पिल्लावर वारंवार बलात्कार झाला होता. या पिल्लाला न्याय मिळावा, अशी मागणी तिने केली आहे. या पिल्लावर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली होती, पण नंतर त्याला जामीन मिळाला. याबद्दल जयाने संताप व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जया भट्टाचार्यने हातात एक श्वानाचं जखमी पिल्लू घेऊन इन्स्टंट बॉलीवूडशी संवाद साधला. यावेळी तिने त्या पिल्लावर झालेल्या अत्याचाराबद्दल सांगितलं. “या दीड महिन्याच्या पिल्लावर नायगाव येथील तिवरी गावातील एका चाळीत बलात्कार झाला. त्याच्यावर वारंवार बलात्कार झाला आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. आरोपी मुलाला अटक झाली, पण त्याला पोलिसांनी सोडलं आहे. आता न्याय कसा मिळेल? हे फक्त या प्राण्याबद्दल नाही, तर सर्व मूक प्राण्यांबद्दल आहे. मग ते कुणाचं ५-१० महिन्यांचं बाळही का असेना. अशा भयंकर घटना घडताना आपण सर्वजण पाहत आहोत. या पिल्लांप्रमाणेच लहान मुलंही बोलू शकत नाही. त्या सर्वांनाही न्याय मिळायला पाहिजे”, असं जया भट्टाचार्य म्हणाली.

हेही वाचा – “आपल्या सणांचे फोटो कधी टाकलेस…”, विचारणाऱ्या नेटकऱ्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचं स्पष्ट उत्तर; म्हणाला…

जया भट्टाचार्यने या पिल्लाला लवकरात लवकर न्याय मिळायला हवा, अशी मागणी केली आहे. तिचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक या प्रकरणावर संताप व्यक्त करत आहेत. या मुक्या प्राण्यावर अत्याचार करणाऱ्याला कठोर शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी करत आहेत. अनेकजण जया भट्टाचार्यने त्या पिल्लाची सुटका केल्याबद्दल तिचं कौतुक करत आहेत.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा –  “आमचा सांता जाऊन १९ वर्षे…”, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्याची वडिलांच्या आठवणीत पोस्ट; म्हणाले, “पप्पा असताना…”

शिबानी दांडेकरची प्रतिक्रिया

जया भट्टाचार्यचा हा व्हिडीओ पाहिल्यावर फरहान अख्तरची पत्नी शिबानी दांडेकरने मदत करण्याची तयारी दर्शवली. त्यावर जयाने उत्तर देत ते पिल्लू सुरक्षित असल्याची माहिती दिली. तसेच शारीरिकदृष्ट्या ते कमकुवत झालं आहे, त्यामुळे त्याची देखभाल केली जात आहे, असंही जयाने सांगितलं. सध्या ती या पिल्लाची काळजी घेत असून त्याच्याबद्दल अपडेट्स तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress jaya bhattacharya saves puppy abused in naigaon chawl hrc