मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरी मागील दोन ते तीन वर्षांपासून अभिनयक्षेत्रापासून दूर होती. ‘पुढचं पाऊल’, ‘सरस्वती’ यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम करत तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. शिवाय ‘बिग बॉस मराठी’ या बहुचर्चित कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती. मध्यंतरी गंभीर आजारामुळे त्रस्त असल्याचं जुईने सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत सांगितलं होतं. एकापाठोपाठ एक आजार व शारीरिक त्रासामुळे जुई त्रस्त झाली होती. याबाबतच तिने आता भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – प्रेयसी, काही वर्षांचं रिलेशनशिप अन् लग्न, समीर चौगुलेंनी लग्नाच्या २५व्या वाढदिवसानिमित्त बायकोला दिलं खास सरप्राइज, म्हणाले…

salman khan sangeeta bijlani marriage broke
जिच्यामुळे मोडलं सलमान खान-संगीता बिजलानीचं लग्न, तिनेच सांगितलं ‘त्या’ दिवशी काय घडलं होतं?
What is beef tallow and how is it made_
Tirupati laddoo: तिरुपतीच्या लाडवाच्या निमित्ताने चर्चेत आलेले बीफ…
Madalsa Sharma quits Anupamaa
मिथुन चक्रवर्तींच्या सूनेने सोडली लोकप्रिय मालिका; म्हणाली, “माझे पती अन् सासरे…”
chhichhore movie has 5 years complete shraddha kapoor share her memories on social media
‘छिछोरे’ सिनेमाला पाच वर्षे पूर्ण! सुशांतबरोबरच्या ‘त्या’ व्हिडीओद्वारे श्रद्धा कपूरचा जुन्या आठवणींना उजाळा, म्हणाली…
Director Called Me Daughter and Raped said Actress
Kerala Actress : “दिग्दर्शक मला म्हणायचा तू मुलीसारखी आहेस, त्याने वर्षभर बलात्कार केला आणि..”, अभिनेत्रीची आपबिती
Renukaswamy murder case photo
Pavithra Gowda: ‘खून होण्याआधी तो हात जोडून…’, अभिनेता दर्शनच्या अत्याचारामुळे मृत चाहत्याचे पालक हादरले
Ishita Raj Confesses Love For Hardik Pandya in Interview After His Divorce with Wife
Hardik Pandya: ‘ही’ बॉलीवूड अभिनेत्री हार्दिक पंड्याच्या प्रेमात, कबुली देत म्हणाली, “माझं त्याच्यावर प्रेम आहे…”
marathi actress suhasini Deshpande
व्यक्तिवेध: सुहासिनी देशपांडे

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेमधून ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने जुई छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. मध्यंतरी आजारापणामुळे घरीच आराम करत असलेली जुई व्यायाम, डाएट करत नव्याने काम करण्यास सज्ज झाली आहे.

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिला तिच्या आजारपणाबाबत विचारण्यात आलं. तेव्हा ती म्हणाली, “माझ्यासाठी माझ्या आजारपणाचा काळ हा खूप जास्तच कठीण होता. खूप वर्ष माझं आजारपण सुरू होतं. कालांतराने आजर वाढत गेला. लॉकडाउनचा काळ हा सगळ्यांसाठी खूप निराशाजनक होता.”

आणखी वाचा – बॉयफ्रेंडशीच केलं लग्न, पण त्याआधीच दुसऱ्या व्यक्तीशी…; लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर शिल्पा तुळसकरचा खासगी आयुष्याबाबत खुलासा

“पण लॉकडाउन माझ्यासाठी खूप चांगला गेला. कारण ती दोन वर्ष मी स्वतःसाठी दिली. आपल्याला रडत बसायचं नाही हे माझ ठरलेलं होतं. कारण माझा मुळ स्वभाव रडत बसण्याचा, निराश होण्याचा किंवा हार मानण्याचा नाही. माझी जीवनशैली मी बदलली. डाएट केलं. रडत न बसता कोणाचा आधार न घेता उभं राहायचं हे मी पक्क केलं. माझ्या त्रासामुळे मी जिथे कुठे जाईन त्याची समोरच्याला जाणीवही होता कामा नये त्याप्रमाणे मी स्वतःला तयार केलं. त्यामुळेच आज मी सकारात्मक पद्धतीने काम करत आहे.” जुई आता नव्या जोमाने सगळ्या आजारांवर मात करत कामाला सुरुवात करत आहे.