अभिनेत्री कविता लाड-मेढेकर या मराठी मनोरंजन सृष्टीतील बहुआयामी अभिनेत्रींपैकी एक. सध्या त्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतील ‘भुवनेश्वरी’ या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. पण जवळपास गेला महिनाभर मालिकेतून ब्रेक घेत त्या अमेरिकेला गेल्या होत्या. त्यावरून एकाच्या हाताने केलेल्या कमेंटला आता कविता मेढेकर यांनी भन्नाट उत्तर दिलं आहे.

‘तुला शिकवीन चांगला धडा’ ही मालिका सुरू असताना दुसरीकडे त्यांचं ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे नाटक रंगभूमीवर सुरू आहे. या नाटकाचे प्रयोग अमेरिकेला होते. त्यानिमित्त कविता मेढेकर जवळपास महिनाभर अमेरिका दौऱ्यावर होत्या. त्यामुळे बरेच दिवस त्या मालिकेमध्ये दिसल्या नाही.

आणखी वाचा : कविता मेढेकरांनी उलगडलं त्यांच्या फिटनेसचं गुपित, ‘अशी’ घेतात स्वतःच्या आरोग्याची काळजी

सोशल मीडियावर सक्रिय राहून कविता त्यांच्या अमेरिका दौऱ्यातील गमती जमती चाहत्यांची शेअर करत होत्या. पण चाहते मात्र त्यांना मालिकेमध्ये खूप मिस करत होते. कविता मेढेकर यांनी नुकताच एक व्हिडीओ शेअर करत अमेरिका ट्रिपदरम्यानचे त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यावर कमेंट करत एका चाहत्याने लिहिलं, “कविता ताई, एकदम झक्कास फोटो!! भुवनेश्वरीला मिस करतोय आम्ही. या आता लवकर.” तर चाहत्याच्या या कमेंटवर उत्तर देत कविता मेढेकर यांनी लिहिलं, “अहो आलेय मी परत. मीही भुवनेश्वरला मिस करतेय.”

हेही वाचा : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मधून ब्रेक घेऊन भुवनेश्वरी गेली अमेरिकेला, मालिकेत करारी भूमिकेत दिसणाऱ्या कविता मेढेकरांचा ग्लॅमरस अंदाज पाहिलात का?

कविता मेढेकर यांनी दिलेलं हे उत्तर आता सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. त्यावरून आता त्या पुन्हा एकदा घरी परतल्या आहेत हे स्पष्ट झालं असून त्या मालिकेत कधी दिसणार याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Story img Loader