पुढच्या आठवड्यात सुरु होणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त सध्या सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. अनेक कलाकार आहे त्यांच्या घरच्या गणपतीच्या तयारीला लागले आहेत. कुणी घरीच गणपतीची मूर्ती बनवत आहे, तर कोणी सजावटीच्या तयारी करत आहे. अभिनेत्री कविता मेढेकर यांनी त्या दरवर्षी गणेशोत्सव कसा साजरा करतात आणि यावर्षी त्या काय वेगळं करणार आहेत हे सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कविता मेढेकर ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत ‘भुवनेश्वरी’ ही भूमिका सकारत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्या म्हणाल्या, “आमच्या मेढेकर घराण्यात पारंपरिक गौरी गणपतीची वर्षानुवर्षे स्थापना होत आली आहे. दरवर्षी आमच्या घरी खूप जल्लोषाने आम्ही बाप्पाचे स्वागत करतो. गौरी गणपती म्हटलं की छान प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळतं. आपले दूरचे नातेवाईक आपल्या घरी येतात त्यामुळे खूप खेळीमेळीचं वातावरण असतं. सगळे मोदक आणि प्रसाद बनवण्यासाठी खूप उत्साही असतात.”

आणखी वाचा : कविता मेढेकरांनी उलगडलं त्यांच्या फिटनेसचं गुपित, ‘अशी’ घेतात स्वतःच्या आरोग्याची काळजी

पुढे त्या म्हणाल्या, “आधी मी आणि माझ्या सासूबाई सगळं सांभाळून घ्यायचो, माझ्या सासूबाईंच्या निधनानंतर माझ्या सासऱ्यांनी मला विचारलं की, तुझ्या कामाच्या व्यापात तुला सगळं सांभाळायला जमेल का? पण मी ते आव्हान स्वीकारलं आणि मनाशी ठरवलं की जो पर्यंत करता येईल तो पर्यंत व्यवस्थित नेहमी प्रमाणे सगळ्या गोष्टी करायच्या. मला खूप अभिमान वाटतो की माझ्या सासऱ्यांनी ती जबाबदारी माझ्याकडे दिली.”

हेही वाचा : “आमच्या सुनेला जास्त त्रास देऊ नको, नाही तर…,” मृणाल कुलकर्णी यांची पोस्ट चर्चेत

शेवटी त्यांनी सांगितलं, “आमच्या पारंपरिक गणपतीची सेवा करण्यास खूप खूप समाधान मिळतं. अगदी ह्या वर्षी सुद्धा ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका आणि ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे नाटक इतक्या व्यस्त शेड्युलमुळे सगळं नीट जमेल की नाही याची धाकधुक होती, पण माझ्या दोन्ही निर्मिती संस्था आणि झी मराठी वाहिनी यांनी खूप सांभाळून घेतलं आणि सगळं कसं व्यवस्थित झालं. मी बाप्पाच्या आगमनाची खूप आतुरतेने वाट बघत आहे. गणपती बाप्पा मोरया .. मंगल मूर्ती मोरया.”