देशभरात निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. राजकीय पक्ष जोरदार प्रचार करण्यात व्यग्र आहेत. वायव्य मुंबई मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर निवडणुक लढवत आहेत. अमोल कीर्तीकर यांच्या प्रचारयात्रेत मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा सहभागी झाल्याचा आणि तो कीर्तीकरांबरोबर असल्याचा गंभीर आरोप भाजपाने केला आहे. या प्रकरणावर अभिनेत्री केतकी चितळेने पोस्ट केली आहे.

केतकी चितळेने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यात तिने कीर्तीकर व ठाकरेंचा उल्लेख केला आहे.
“लाज कशी वाटत नाही ठाकरे तुम्हाला? लकी पेट्रोल पंप उडाला (जो आम्हाला त्यावेळी ट्रकचे टायर फुटले असावे वाटले आवाज ऐकून) त्यातील आरोपीला स्टार प्रचारक म्हणून मिरवताय?
कीर्तीकरांना तसेच मी मत देणार नव्हतेच पण आज बाळासाहेबांमुळे जो काही ०.०००१ टक्के आदर मनात होता तुमच्याविषयी, तोही तुम्ही मातीत मिळवण्यात यशस्वी झालात.
राग, चीड, द्वेष, संताप अशा भावना देखील मनात येत नाहीयेत; येते आहे ती फक्त कीव,” अशी पोस्ट केतकी चितळेने केली आहे. केतकीची ही इन्स्टाग्राम पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

हेही वाचा – बाँम्बस्फोटातील आरोपी अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारफेरीत, भाजप आमदार अमित साटम यांचा आरोप

ketaki chitale
केतकी चितळेची पोस्ट

नेमकं प्रकरण काय?

महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या प्रचारयात्रेत मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा सहभागी झाला होता आणि तो कीर्तीकर यांच्याबरोबर आहे, असा गंभीर आरोप भाजपाने गुरुवारी केला. प्रचारयात्रेत कीर्तीकर यांच्याजवळ इक्बाल मुसा असल्याचे काही फोटो व व्हिडीओ भाजपाचे आमदार अमित साटम यांनी सोशल मीडियावर प्रसारित केले होते.

हेही वाचा – सुपरहिट चित्रपट, दोन घटस्फोट, तीन लग्नं अन्…; ऋषी कपूर यांची ‘ही’ हिरोईन आहे सुप्रसिद्ध क्रिकेटपटूची सासू

अमोल किर्तीकरांनी फेटाळले आरोप

भाजपाने केलेले हे गंभीर आरोप कीर्तिकर यांनी फेटाळून लावले आहेत. प्रचारयात्रेत ४००-५०० लोक येतात, जवळ येऊन स्वत:ची ओळख करून देतात. त्यातील सगळ्यांना उमेदवार ओळखत नसतात. जर इक्बाल मुसा हा बॉम्बस्फोटातील आरोपी आहे, तर मग तो बाहेर कसा? असा प्रश्न ठाकरे गटाचे वायव्य मुंबईतील निवडणूक प्रतिनिधी राजेश शेट्ये यांनी उपस्थित केला होता.

Story img Loader